चंद्रपूर : अन्न सुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दर महिन्याला दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू असे पाच किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. दरम्यान, या धान्याचे काही प्रमाणात वाटप रेशन दुकानांपर्यंत पोहोचले आहे. मात्र, अद्यापही अनेक गावांमध्ये या मोफत धान्याचे वाटप सुरु करण्यात आलेले नाही. त्यामुळे गरजूंना अडचण निर्माण होत आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य शासनाने लॉकडाऊन सुरु केले आहे. त्यामुळे सर्व व्यवसाय ठप्प आहेत. अनेकांचे रोजगार गेल्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मजूर व कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लॉकडाऊनमुळे त्यांची रोजीरोटी बुडाली आहे. दरम्यान, राज्य शासनाने मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यातील ---- लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत धान्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरावर स्वागत करण्यात आले. परंतु, ही घोषणा करुन दोन आठवड्यांपेक्षा अधिकचा कालावधी होत आहे. परंतु, अद्यापही धान्य वाटपासंदर्भात प्रत्यक्षात कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे गरजू लाभार्थ्यांना या योजनेच्या लाभाची प्रतीक्षा लागून आहे.
बॉक्स
मोफत धान्य काय मिळणार
रेशन दुकानावर अंत्योदय अन्य योजनेतील लाभार्थ्यांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू व २ किलो तांदूळ तर प्राधान्य कुटुंब योजना गटातील लाभार्थ्यांना २ किलो गहू व २ किलो तांदूळ मिळणार आहे.
बॉक्स
लॉकडाऊनमुळे रोजीरोटी बंद झाली. शासनाकडून मोफत धान्य मिळण्याची अपेक्षा होती. परंतु, अद्यापही शासनाकडून कुठल्याही प्रकारचे धान्य तसेच मदत मिळालेली नाही. त्यामुळे कुटुंब चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे.
--मजूर
------
घराबाहेर पडणाऱ्यांवर शासनाने निर्बंध घातले आहेत, कामही बंद आहे. घराबाहेर पडले तर कोरोनाने मरण्याची आणि घरी राहिले तर उपाशी मरण्याची वेळ आहे. त्यामुळे शासनाने त्वरित धान्याचे वितरण करावे तसेच इतर मदतसुद्धा करावी.
--कामगार
------
लॉकडाऊन करताना मोठी घोषणा करत लॉकडाऊन केले. मात्र, अद्यापही कोणत्याही प्रकारचे धान्य उपलब्ध करुन दिले नाही. रेशन दुकानातील तेल व साखरही बंद केली आहे. लॉकडाऊनचा फायदा घेत व्यापारी चढ्या दराने वस्तूची विक्री करत आहेत.
- मजूर
------
कोट
काही ठिकाणी धान्याचे वाटप सुरु आहे. काही लाभार्थ्यांना एप्रिलमध्ये मोफत धान्य देण्यात आले. तर उर्वरित लाभार्थ्यांना मे महिन्यात मोफत धान्य देण्यात येणार आहे.
- जनार्धन लोंढे, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर