सर्वच तीर्थक्षेत्रांचा ‘क’ दर्जा : यात्रेत केवळ १५ हजाराची मदतसाईनाथ कुचनकार - चंद्रपूरऔद्योगिक दृष्ट्या संपन्न असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तब्बल ७३ तीर्थक्षेत्र आहे. मात्र या स्थळांचा पाहिजे जसा विकास झाला नसल्याने आजही सदरक्षेत्र उपेक्षित आहे. किमान सुविधा उपलब्ध करून देऊन येथील विकास साधावा, अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे.ब्रह्मपुरी, गोंडपिपरी, चिमूर, सिंदेवाही या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तिर्थक्षेत्र आहे. मात्र विकास झाला नसल्याने येथे येणाऱ्या भाविकांना अनेक हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. जिल्हा परिषदेकडून यात्रा महोत्सवासाठी तीर्थक्षेत्रासाठी केवळ १५ हजार रुपयांची मदत केली जाते. ही मदतही तुटपुंजी असल्याने यात्राकालावधीमध्ये या निधीतून भाविकांची कशी व्यवस्था करावी, हा प्रश्न पडतो. विशेष म्हणजे, यात्रा असताना पिण्याचे पाणी, स्वच्छता, बसण्याची सुविधा, रस्त्याची डागडुजी आदी कामे करणे अपेक्षित आहे. मात्र निधी मिळत नसल्याची तक्रार सर्व तीर्थस्थळामधून आहे.विशेष म्हणजे, जिल्हा नियोजनामधून या स्थळांच्या विकासासाठी ३० लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र या निधीतूनही पाहिजे तसा विकास होत नसल्याची ओरड आहे. नेमका निधी कुठे जातो, हा प्रश्नही ग्रामस्थांना पडला आहे. तीर्थस्थळ आणि पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या असलेल्या या स्थळांकडे शासन तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीही पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.
तीर्थक्षेत्रांची उपेक्षा संपणार कधी?
By admin | Published: January 03, 2015 10:58 PM