माजरी : माजरी रेल्वे स्टेशनच्या शंभर मीटर अंतरावरील माजरी-भद्रावती-चंद्रपूर मार्गावर मेन लाईन चेन्नई दिल्ली मार्गावर रेल्वे गेट आणि माजरी-वणी-आदिलाबाद, मुंबई, कोल्हापूर मार्गावर असे दोन रेल्वे गेट असल्याने गेट नेहमी बंदच राहत असते. याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याबाबत अनेक वर्षांपासून मागणी होत असून लोकप्रतिनिधी आणि रेल्वे प्रशासन या सर्वांनी माजरी गेटकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
माजरी ते भद्रावती ते मुख्य रस्ता या रेल्वे मार्गावर दोन रेल्वे गेट आहेत. जे गाड्यांच्या हालचाली दरम्यान नेहमीच तासनतास हे दोन्ही गेट बंद राहते. या मार्गावरून भद्रावती-चंद्रपूर किंवा नागपूरकडे जाणाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एवढेच नाही तर रुग्णवाहिका गंभीर रुग्णांना घेऊन जात असताना गेट केव्हा सुरू होईल, याची वाट बघत राहावी लागत असते. रेल्वेची ही मुख्य लाईन असल्याने या मार्गावरील गाड्यांची खूप जास्त रहदारी सुरू असते. ज्यामुळे हे गेट दर पाच मिनिटांनी बंद करावे लागते. पहिला गेट सुरू झाला की दुसरा बंद असते. गेटवर माजरी-वणी मार्गाच्या कोळशाच्या रेल्वे साईडिंगमुळे या मार्गावरील कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. तसेच या मार्गावर सुपरस्टार ट्रेन चालत असते आणि कोळसा साईडिंग रेल्वे जवळून रेल्वे गेटकडे जाताना रेल्वे रूळ उंचीवर असल्याने कोळशाने भरलेल्या गाड्यांची मागे पुढे सरकणे सुरू असल्याने बराच वेळ गेट सुरू व्हायला लागतो. यामुळे जवळजवळ एक ते दीड तास हा गेट बंद राहते. त्यामुळे याठिकाणी उड्डाणपूल बांधावा, अशी मागणी आहे.
260721\20210725_113003-blendcollage.jpg
माजरी रेल्वे गेटवर कधी होणार उडान पूलाचे बांधकाम
अनेक वर्षांपासून ची मागणी कडे लोकप्रतिनिधी चे दुर्लक्ष