सहा लाखाचे घड्याळ घालणारा ‘तो’ काँग्रेस आमदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:37 PM2018-06-15T12:37:40+5:302018-06-15T12:37:47+5:30

अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना निरोप देण्यासाठी एक काँग्रेस आमदार पुढे आले. यापुढे असे विदेशी कंपनीचे महागडे घड्याळ घालून माझ्यासमोर येऊ नका, अशी तंबी राहुल गांधी यांनी दिली.

Who is the Congress MLA who has wearing six-laces watch? | सहा लाखाचे घड्याळ घालणारा ‘तो’ काँग्रेस आमदार कोण?

सहा लाखाचे घड्याळ घालणारा ‘तो’ काँग्रेस आमदार कोण?

Next
ठळक मुद्देराहुल गांधींनी दिली समज

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांना निरोप देण्यासाठी एक काँग्रेस आमदार पुढे आले. त्यांच्या मनगटावर सहा लाख रुपये किमतीची रोलेक्स या विदेशी कंपनीची घड्याळ बघून राहुल गांधी संतापले आणि लगेच त्या आमदाराला यापुढे असे विदेशी कंपनीचे महागडे घड्याळ घालून माझ्यासमोर येऊ नका, अशी तंबी दिली. या घटनेनंतर काँग्रेसचा ‘तो’ आमदार कोण, हे जाणून घेण्यासाठी अनेकांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
हाच धागा पकडून काँग्रेसच्या एका गटाने एक प्रसिद्धी पत्रक काढून महागडी घड्याळ घालणाऱ्या काँग्रेस आमदाराला पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या संस्कृतीची जाणिव करुन दिल्याचे म्हटले आहे. यावरून नव्या चर्चेला उधान आले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर राहुल गांधी यांचा चंद्रपूर जिल्ह्यात पहिला दौरा होता. मात्र चंद्रपूर जिल्हा काँग्रेसमधील गटबाजी खुद्द अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या समक्ष गेली असल्यामुळे भविष्यात पुन्हा काँग्रेसचे दोन गट आमने-सामने येण्याची चिन्हे यानिमित्ताने दिसू लागली आहेत.
एचएमटी तांदळाचे जनक व कृषिभूषण दादाजी खोब्रागडे यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड येथे आले होते.
राहुल गांधी यांनी शेतकरी व जनतेच्या हितासाठी एक गुप्त यंत्रणा ठेवली आहे. नांदेडचा कार्यक्रमही राहुल गांधी यांनी स्वत: या यंत्रणेच्या माहितीच्या आधारेच आखला होता. नांदेड हे गाव चिमूर मतदार संघात येत असल्यामुळे डॉ. वारजुकर यांच्यावर जबाबदारी हवी होती. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मर्जीतल्या व्यक्तीवर ती सोपविली. त्यांनी चंद्रपूर व गडचिरोलीचे माजी खासदार उपस्थित राहू नये, अशी चोख व्यवस्था केल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Web Title: Who is the Congress MLA who has wearing six-laces watch?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.