उत्सुकता शिगेला : सावलीत महिलाराजसावली : पहिल्या नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष कोण, याबाबतची सावलीनगरवासीयांची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. ३० नोव्हेंबरला नगराध्यक्ष पदाची निवडणूक होवू घातली आहे. यासाठी २३ नोव्हेंबर रोजी पाच नामांकन अर्ज सावलीच्या तहसीलदार वंदना सौरंगपते यांच्याकडे दाखल करण्यात आले. नगराध्यक्ष पदाचे पहिले आरक्षण अनुसुचित जातीच्या महिलांकरीता राखीव आहे. १७ सदस्य असलेल्या नगरपंचायतीमध्ये १० नगरसेवक काँग्रेसचे आहेत. पाच राष्ट्रवादी काँग्रेसचे एक बसपा तर एक अपक्ष असे पक्षीय बलाबल आहे. यात काँग्रेस पक्षाकडून रजनीताई भडके यांनी चार नामांकन अर्ज सादर केले आहेत. तर एकमेव असलेल्या बसपाच्या नगरसेवक संगीता प्रीतम गेडाम यांनी एक नामांकन अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसकडे दहा नगरसेवक असल्याने रजनीताई भडके यांच्या नगराध्यक्ष पदावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. परंतु एकमात्र असलेल्या बसपाच्या नगरसेवक संगीता गेडाम यांनी नगराध्यक्ष पदासाठी नामांकन अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीची उत्सुकता वाढलेली आहे.सकृत दर्शनी १० विरूद्ध ७ असे समिकरण असले तरी ३० तारखेलाच प्रत्यक्ष निकालासाठी वाट बघावी लागणार आहे. या क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीची सर्व सुत्र आपल्या हातात ठेवून सावली नगरपंचायतीवर काँग्रेसचा झेंडा रोवण्याचा निश्चय केला होता. त्यात ते यशस्वी झाले. नगराध्यक्षसुद्धा आपल्याच पक्षाचा करतील यात तीळमात्रही शंका नाही. तरी विरोधी नामांकन प्राप्त झाल्याने नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे.पहिल्या नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष होणे ही ऐतीहासीक बाब आहे. त्यामुळे विरोधकांकडूनही जोर लावण्याचे काम सुरू झाले आहे. (तालुका प्रतिनिधी)
सावली नगरपंचायतीचा पहिला नगराध्यक्ष कोण?
By admin | Published: November 27, 2015 1:25 AM