चिंधिचक : या परिसरातील जनकापूर, चिंधिमाल, चिंधिचक, मागरुड, केटाळी (बो.) हुमा, खडकी, घोडाझरी, अड्याळ मेंढा या भागात वन्यप्राण्यांच्या त्रासाला शेतकरी कंटाळला असून या भागातील धानपिक वन्यप्राणी नासधूस व जमीनदोस्त करीत आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याने वन विभागाकडे आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.या भागात रानडुक्कर, रोही, नीलगाय या वन्यप्राण्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश धानपिक वन्यप्राणी उद्ध्वस्त करीत आहेत. यावर्षी वरुणराजाने शेतकऱ्यांना तारले असले तरी वन्यप्राण्यांनी मारले, अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून ऐकण्यात येत आहे. त्यामुळे वन विभागाने शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत करण्याची मागणी या परिसरात जोर धरत आहे. (वार्ताहर)
वन्यप्राण्यांनी धानपीक केले जमीनदोस्त
By admin | Published: October 28, 2016 12:47 AM