राजुरा : वनपरिक्षेत्र कार्यालयाने वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधून पत्रकार व विद्यार्थ्यांकरिता वनभ्रमण सहलीचे आयोजन केले. तसेच वन विभाग वसाहतीत स्वच्छता अभियानासह वन व्यवस्थापन समिती, शिक्षक, विद्यार्थी व नागरिकांसोबत गावोगावी रॅलीचे आयोजन करण्यात आले.महात्मा गांधी व लालबहादूृर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून राजुरा येथील वन वसाहतीमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. खांबाडा, सुमठाणा, विहीरगाव, कापणाव, आर्वी, तुलाना येथे वृक्षदिंडी गावातून काढण्यात आली. वरील गावात वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, शाळेतील विद्यार्थी, गावकरी व वनकर्मचारी प्रमुख मार्गाने हाती फलक घेऊन वन्यप्राण्यांचे मुखवटे परिधान करून मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते. निसर्ग निर्वाचन केंद्र येथे विद्यार्थ्यांना वन्य प्राण्यांची चित्रफीतही दाखविण्यात आली. वन्यजीव पर्यावरण जंगलाचे संवर्धन व संरक्षण करावे. या विषयाची आवड निर्माण होण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार, क्षेत्रसहायक एन.जी. गोविंदवार, के.एन. घुग्लोत, एम.व्ही.धांडे, बीट वनरक्षक के.पी. येनूरकर, डी.आर.शेंडे, ए.व्ही. मत्ते, व्ही.डी.पवार, एम.आर. निमकर, वनव्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)विद्यार्थ्यांना सांगितली वृक्षांची शास्त्रीय नावेराजुरा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालयातील गावकऱ्यांना वनांचे व वन्यप्राण्यांचे महत्त्व समजावून सांगितले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लावणे व प्राण्यांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक मेडपल्लीवार यांनी केले. पत्रकार व आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना कम्पार्टमेंट क्रमांक १५५, १५६ व १६४ मध्ये वनभ्रमण सहलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी त्यांना प्राण्यांचे दर्शन घडवून आणत वृक्षांची स्थानिक नावे शास्त्रीय नावे समजावून सांगण्यात आली.
राजुरा वनपरिक्षेत्रामार्फत वन्यजीव सप्ताह साजरा
By admin | Published: October 15, 2016 1:01 AM