शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाजपाच्या इच्छाशक्तीने महापौरपदाची चुरस वाढणार

By admin | Published: October 25, 2014 10:36 PM

केंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत.

काँग्रेस विभागली तीन गटात : पुगलिया-नागरकर यांचा गट एकत्रगोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूरकेंद्रात भाजपा, राज्यात भाजपा आणि आता गावातही भाजपाचीच सत्ता हवी असा संदेश सदस्यांमध्ये घुमवित चंद्रपूर मनपातील महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपाचे नगरसेवकही सिद्ध होऊ पाहात आहेत. काँग्रेसमधील एका गटाला मदत करण्यापेक्षा असंतुष्टांच्या सहकार्याने आपलीच सत्ता स्थापण्याचे मनसुबे भाजपाच्या गोटात रचले जात असल्याने चंद्रपुरातील महापौर पदाच्या निवडणुकीत रंग भरला जाण्याची शक्यता आहे.चंद्रपूर महानगर पालिकेत काँगे्रस हा सर्वात मोठा पक्ष आहे. २६ सदस्य या पक्षाकडे आहेत. त्या पाठोपाठ भाजपाकडे १८ सदस्य असल्याने या पक्षाचा दुसरा क्रमांक लागतो. गेल्या लोकसभा निवडणुकीपासून चंद्रपूर महानगर पालिकेत काँग्रेस तीन गटात विभागली आहे. विद्यमान महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी यांनी वेगळी चुल मांडल्यापासून पक्षातील अंतर्गत वातावरण ताणाताणीचे झाले आहे. आपल्या गटाकडे १० ते १२ सदस्य असल्याचा या गटाचा दावा आहे. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे काँगे्रसच्या गटाची सर्व सुत्रे होती. मात्र रिलायन्स जीओच्या मुद्यावरून महापौरांचा गट वेगळा झाला. असे असले तरी नरेश पुगलिया यांनी मनपाच्या राजकारणातील आपली पकड घट्ट ठेवली आहे. १२ ते १५ सदस्य आपल्या गटाशी अद्यापही जुळून असल्याचा दावा या गटाकडून होत आहे.तिसरा गट माजी स्थायी समिती सभापती आणि विद्यमान महानगर काँग्रेस जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांचा आहे. माजी नगराध्यक्ष सुनिता लोढीया यांच्यासह पाच नगरसेवक या गटासोबत जुळून आहेत. काँग्रेस महानगर अध्यक्ष या नात्याने नागरकर यांची जबाबदारी मनपात वाढली आहे. महत्वाचे म्हणजे ते स्वत: मनपाच्या राजकारणात सक्रिय असून नगरसेवक आहेत. त्यामुळे आपली कामगिरी त्यांना पक्षापुढे दाखवावीच लागणार आहे.राजकारणातील बेरीज-वजाबाकीमध्ये निवडणुकीच्या तोंडावर महापौर अमृतकर यांचा गट आणि भाजपा जवळ आले आहेत. अमृतकर गटाने राखी कंचर्लावार यांना भावी महापौर म्हणून पुढे केले आहे. भाजपानेही या नावावर सहमती दर्शवित या गटाला मदतीचे आश्वासन दिले होते. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाची मानसिकताहीे सत्तास्थापनेकडे झुकल्याने महापौरांचा गट अस्वस्थ झाला आहे. दरम्यान, तडजोडीच्या राजकारणात नंदू नागरकर आणि नरेश पुगलिया यांचा गट बराच जवळ आला आहे. या गटाच्या आजवर किमान दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या असून एकत्रित येऊन महापौरपदाची निवडणूक लढण्याची रणनिती आखली आहे. या दोन्ही गटांचे मिळून १५ नगरसेवकांचे संख्याबळ जुळले आहे. या सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि महापौर गटातील नगरसेवकही आपल्या संपर्कात असल्याचा दावा या गटाकडून होत असल्याने पुगलिया- नागरकर गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या गटाने अद्याप आपला महापौरपदाचा उमेदवार जाहीर केलेला नसला तरी सोमवारनंतर संयुक्त बैठकीतून महापौरपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.