चंद्रपूर : मनपाच्या शाळेत दर्जेदार शिक्षण व सर्व भौतिक सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहे. मनपाच्या १० शाळा डिजिटल करण्यात येत आहे, असे प्रतिप्रादन महापौर अंजली घोटेकर यांनी केले. चंद्रपूर शहर महानगरपालिका येथील देवई गोविंदपूर तुकूम प्राथमिक शाळा व लोकमान्य टिळक कन्या प्राथमिक शाळेचा पहिला दिवस कन्या प्रवेशोत्सव म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजली घोटेकर होत्या. याप्रसंगी त्या बोलत होत्या. आयुक्त संजय काकडे, महिला व बाल कल्याण समिती सभापती अनुराधा हजारे, नगरसेविका पुष्पा उराडे, प्रशासन अधिकारी (शिक्षण) नागेश नीत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा चिंगलवार व पालक उपस्थित होते. शाळेला रंगरंगोटी व भिंती बोलक्या करण्यात येत आहे. सर्व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी डेक्स बेंच, गणवेश, दप्तर, बुट, मोजे, टॉय, बेल्ट देण्यात येणार आहे. तसेच शहरात वृक्षारोपणासाठी सर्व शाळांनी वृक्षदिंडी काढून परिसरात जनजागृती करण्याचे आवाहनही महापौर घोटेकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी दे. गो. तुकूम प्राथमिक शाळेला पंडित दिनदयाल उपाध्याय असे नांव देण्याचा ठराव महापौर अंजली घोटेकर यांनी घेतला आहे. पहिल्या वर्गात दाखल विद्यार्थ्यांना महापौर आयुक्त यांचे हस्ते पुस्तके व झाडाचे रोपटे देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. काकडे म्हणाले, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शैक्षणिक आधुनिक तंत्रज्ञान ई-लर्निंग द्वारे देणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक रेखा चिंगलवार यांनी केले. संचालन सुनिता नागभिडकर, तर आभार नागेश नीत, प्रशासन अधिकारी यांनी केले.
मनपाच्या १० शाळा डिजिटल करणार -अंजली घोटेकर
By admin | Published: June 29, 2017 1:41 AM