जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये पालकमंत्री विजय वडेट्टीवार, आमदार किशोर जोरगेवार, मनपा आयुक्त राजेश मोहिते, सीबीएसएसचे अध्यक्ष डाॅ. गोपाल मुंधडा, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, वाहतूक व उपप्रादेशिक विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
जटपुरा गेटजवळील वाहतूक कोंडी नेहमीचीच झाली आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ तसेच अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी चंद्रपूर बचाव संघर्ष समितीने काही दिवसापूर्वी भारती हाॅस्पिटलमध्ये बैठक आयोजित केली होती. यामध्ये विविध सामाजिक संघटनांचे सदस्य उपस्थित होते. यवेळी जटपुरा गेटजवळील वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ॲड. प्रशांत खजांची यांच्या मार्गदर्शनात निवेदन तयार केल्यानंतर पालकमंत्र्यांना देण्यात आले.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी या समस्येचे दखल घेत बुधवारी बैठक आयोजित केली होती. यावेळी डाॅ. गोपाल मुंधडा यांनी वाहतूक कोंडीमुळे उद्भवणाऱ्या समस्या अवगत करून दिल्या. आमदार किशोर जोरगेवार हे सुद्धा ही समस्या सोडविण्यात यावी यासाठी आग्रही होती. यावेळी डाॅ. बालमुकुंद पालिवार, अश्विनी खोब्रागडे, मंगेश खाटित, विजय चंदावार यांची उपस्थिती होती. दरम्यान, आर्किटेक्ट आनंद मुंधडा यांनी पाॅवर पाॅइंटद्वारे प्रेझेंटेशन केले.
बाॅक्स
अशी आहे उपाययोजना
किल्ल्याच्या दक्षिणेकडील १० फूट रस्ता दुचाकीसाठी राखून ठेवण्यासह आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक सिग्नल कार्यान्वित करण्याचा समावेश आहे. तर कायमस्वरूपी उपाययोजनांमध्ये जटपुरा गेट कायम ठेवून दोन्ही बाजूची भिंत तोंडणे, भूमिगत मार्ग तयार करण्यासाठी अभ्यास करणे, ऐतिहाससिक चोर खिडकीला धक्का न लावता उड्डाणपूल बांधून पर्यायी मार्ग तयार करणे, दोन्ही मार्गाची रुंदी वाढविण्याचाही समावेश आहे.