आरक्षणामुळे महिलांमध्ये उत्साह : जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्नचंद्रपूर : प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सहा दिवसांपूर्वी महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे यावेळीदेखील मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या विद्यमान नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फिरणे सुरू केले आहे. भल्या सकाळीच हे नगरसेवक आता वॉर्डात नागरिकांशी संवाद साधताना दिसून येत आहे.ग्रामीण भागात जिल्हा परिषद तर दुसरीकडे चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातही निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असा अंदाज आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत निवडणुकीत असलेले ३३ प्रभाग तोडण्यात आले आहेत. यावेळी यात बदल झाला आहे. सध्या अस्तित्वात असलेले ३३ प्रभाग मोडीत काढून नव्याने १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. यात १७ प्रभागापैकी १५ प्रभागात प्रत्येकी चार नगरसेवक तर उर्वरित दोन प्रभागात तीन नगरसेवक, असे एकूण ६६ नगरसेवक निवडून द्यायचे आहेत.प्रभाग रचना व प्रभागातील आरक्षण डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात ही आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर मागील आठवड्यात महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. ूहे आरक्षण पुन्हा ओबीसी महिलांसाठी राखीव आल्याने महापौर पदाचे स्वप्न बघणाऱ्या पुरुष उमेदवारांचा स्वप्नभंग झाला आहे. त्यांना पुन्हा पुढील अडीच वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. मात्र महापौर पद ओबीसी महिलांसाठी राखीव झाल्याने विद्यमान महिला नगरसेविका व काही नगरसेवकांनी आपापल्या प्रभागात फेरफटका मारणे सुरू केले आहे. कधी नव्हे ते भल्या सकाळीच हे नगरसेवक वॉर्डात नागरिकांशी बोलताना दिसत आहे. (शहर प्रतिनिधी)नागरकरांची अनुपस्थितीशहरातील लहामगे-तिवारी गटाचे १५ नगरसेवक व काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते. मात्र काँग्रेसचे शहर (जिल्हा) अध्यक्ष नंदू नागरकर यावेळी उपस्थित नव्हते. याबाबत त्यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, अशी बैठक शहरात झाल्याचे माहीत नाही. मात्र बैठक झाली असल्यास ग्रामीण अध्यक्षांनी आधी सुरू असलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत लक्ष द्यावे. जिल्हा परिषदेत पक्ष जिंकला तर त्याचा फायदा चंद्रपूर शहरातही होणारच आहे. त्यामुळे ग्रामीण अध्यक्षांनी पक्षाचे हित कशात आहे, हे लक्षात घेतले तर पक्षाला फायदाच होईल. आपण सर्वांना सोबत घेऊन काम करीत आहेत. शहरात पक्षाकार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उमेदवारी कोणाला द्यायची या संदर्भात पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणारच आहेत, असेही ते म्हणाले.फ्रंटल आॅर्गनायझेशन व १५ नगरसेवकांची बैठकविधानसभेचे उपगेटनेता आमदार विजय वडेट्टीवार यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे १५ नगरसेवक व काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनच्या जिल्हाध्यक्षांची महत्त्वपूर्ण बैठक आज बुधवारी पार पडली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष नंदू नागरकर यांच्या काँग्रेसच्याच नगरसेवकांच्या विरोधातील वागणुकीबाबत नाराजीही व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे. या बैठकीला मनपाचे स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, माजी सभापती रामूृ तिवारी, काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष आश्विनी खोब्रागडे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊणकर, चंद्रपूर लोकसभा क्षेत्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवा राव, सचिन कत्याल, अल्पसंख्याक विभागाचे शाकीर मलिक, माजी महापौर संगिता अमृतकर, राजेश अड्डूर, सुनिता अग्रवाल, अनिता कथडे, अनिल रामटेके, अजय खंडेलवाल, दुर्गेश कोडाम, पिंटू शिरवार, राजकुमार उके आदी उपस्थित होते. यावेळी कुणाशीही आघाडी न करता सर्व ६६ जागा लढविण्याचा निर्णय घेण्यात आला.
मनपा नगरसेवकांच्या प्रभागात वाऱ्या
By admin | Published: February 09, 2017 12:37 AM