शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

शील, प्रज्ञेच्या प्रेरणेसाठी जागतात अख्खी रात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 11:21 PM

विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.

ठळक मुद्देसंघारामगिरीत महापरित्राण पाठ : दोन हजार धम्म श्रावकांची उपस्थिती

राजकुमार चुनारकर।लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : विश्वाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धाचा धम्म हा विज्ञानावर आधारित आहे. भारतीय संविधानात धम्माच्या अनेक बाबींचा समावेश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला. त्यामुळे लोकशाही टिकून आहे. तथागताचा धम्म मानवाला वैज्ञानिक दृष्टीने जीवन जगण्याचा मार्ग दाखवितो. यातून शील व प्रज्ञेची प्रेरणा मिळते. त्यामुळे हजारो श्रावक संघारामगिरीत येऊन अख्खी रात्र जागतात. प्रबोधनाचा संदेश घेऊन आपापल्या गावाला परततात. यंदाच्या कार्यक्रमातही हेच दृश्य दिसून आले.अडीच हजार वर्षांपूर्वी तथागत बुद्धाचा धम्म भारतात अस्तित्वात होता. कालांतराने सम्राट अशोक यांच्यानंतर धम्माला उतरती कळा लागली. मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्म दीक्षेमुळे भारतात धम्म पुन्हा गतिमान झाला. यासाठी भिक्षू संघ कार्य करीत आहे. २५ वर्षांपूर्वी संघरामगिरी येथे भन्ते महाथेरो ज्ञानज्योती यांनी गुजगव्हाण येथून पाच किमी अंतरावर भिक्षु संघासाठी तपोभूमी निर्माण केली. या तपोभूमीवर ३० ते ३१ जानेवारीला मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो बौद्ध बांधव उपस्थित राहून बौद्ध धम्माचे तत्वज्ञान ग्रहण करतात. संघारामगिरीत भन्ते महाथेरो ज्ञानजोती यांनी या बौद्ध उपासकांसाठी महापरित्रान पाठाचे आयोजन केले होते.धम्माला वैज्ञानिक अधिष्ठानरात्री १० वाजता सुरू झालेल्या ज्ञानसोहळ्याचा समारोप पहाटे ५ वाजता झाला. महापरित्राण पाठातून निर्वाणपदाचा साक्षात्कार, आनापानसती आणि विपश्यना भावनेचा अभ्यास करून जीवन मंगलमय करण्याची संहिता अनुभवतात. चित्ताला प्रज्ञापूर्वक आदेश देऊन दहा पारमिताचे पालन करण्याचा संकल्प साक्षी भावनेने केले जाते. यासाठी बुद्धाने सांगितलेल्या विविध तृष्णांचे निसरण करण्याचे बळ व मार्ग या अधिष्ठानामधून उपासकान्ाां गवसतो. वैज्ञानिक कसोटीवर खरे उतरणारे हे अधिष्ठान ज्ञानाचा ठेवा आहे. सर्वसामान्य नागरिकांना दोन-तीन तास एकाच ठिकाणी बसून कार्यक्रम एक म्हटले कंटाळा येतो. मात्र अधिष्ठानामध्ये कोणत्याही प्रकारचा आत्मक्लेश, आत्मपिडा अथवा कष्ट नसल्याने जीवन जगण्याचा सम्यक मार्ग उपासकांना प्राप्त होतो. त्यासाठी सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प अंगिकारने अपेक्षित असते. यंदा दोन हजार उपासकांनी कडाक्याच्या थंडीतही रात्र जागून धम्मातील शील,समाधी,व प्रज्ञा ग्रहण करण्याचा प्रयत्न केला.