शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

दिव्यांगांच्या मदतीसाठी १५ दिवसांत समिती

By admin | Published: September 18, 2016 12:47 AM

वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा संकल्प केला आहे.

पालकमंत्र्यांची घोषणा : बल्लारपुरात दिव्यांग तपासणी शिबिरचंद्रपूर : वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींची एक समिती येत्या १५ दिवसांत आपण गठित करणार असून शासन दिव्यांग बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही राज्याचे अर्थ व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर येथे दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून शनिवारी ना. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, सहायक उत्पादन केंद्र एलिस्को तसेच भारत सरकारच्या माध्यमातुन दिव्यांग व्यक्तींना नि:शुल्क मदत व सयंत्रांचे वितरण करण्याच्या दृष्टीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन बल्लारपूर येथील संत तुकाराम महाराज सभागृह येथे करण्यात आले. उदघाटन समारंभात ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना शामकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचलार्वार, डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, सामाजिक कार्यकर्ते श्रीराम पान्हेरकर, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर, अमेय प्रकाशनचे उल्हास लाटकर, तुषार सोम, ब्रीजभूषण पाझारे, वनिता कानडे, रेणुका दुधे, अजय कौटीकवार आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)तपासणी शिबिराला दिव्यांगांचा उत्स्फूर्त प्रतिसादनियमाची अडचण नाही : तीन महिन्यानंतर साहित्याचे वितरणचंद्रपूर : दिव्यांग हा शब्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय विचारपूर्वक वापरला आहे. शरिराच्या एखाद्या भागाला काही कारणास्तव जेव्हा अपंगत्व प्राप्त होते, तेव्हा परमेश्वर त्या भागाला विशेष दिव्यशक्ती प्रदान करतो. त्यामुळे अपंग असा उल्लेख न करता त्यांना दिव्यांग, असे पंतप्रधानांनी संबोधले आहे, अशी माहिती ना.सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपुरात आयोजित विशेष तपासणी शिबिराप्रसंगी दिली. या शिबिराला दिव्यांग बांधवांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, दिव्यांग बांधवांना सहानुभूतीची नाही तर संधीची आवश्यकता आहे. अनेक दिव्यांगांनी आपले श्रेष्ठत्व आपल्या कौशल्याच्या व कर्तृत्वाच्या बळावर सिध्द केल्याचा इतिहास आहे. सुरदास अंध होते. पण त्यांच्या सुरावटींनी हजारों रसिक मंत्रमुग्ध व्हायचे. येत्या काळात अपंग वित्त विकास महामंडळाच्या नावात बदल करून दिव्यांग वित्त विकास महामंडळ, असे नाव या महामंडळाला देण्याच्या दृष्टीने आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचेही ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.या शिबिरात तपासणीनंतर तीन महिन्यांत दिव्यांग बांधवांना साहित्य वितरित करण्यात येणार आहे. यासाठी नियमांची कोणतीही अडचण येणार नाही. या शिबिरात सहभागी होणाऱ्या प्रत्येक दिव्यांग बांधवांना मदत मिळेलच, याची ग्वाही त्यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा गुहे यांनी केले. या जिल्हास्तरीय दिव्यांग तपासणी शिबिरासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली असून तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. तालुकानिहाय स्टॉल्स उभारण्यात आले व दिव्यांग बांधवांची नोंदणी करण्यात आली.दिव्यांग बांधवांसाठी भोजनाची व्यवस्थासुध्दा करण्यात आली होती. प्रशासनासह विविध सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते व्यवस्थांमध्ये सक्रीयपणे सहभागी होते. शिबिरात सुमारे दोन हजार दिव्यांग बांधवांची तपासणी करण्यात आली. तीन महिन्यांनंतर दिव्यांग बांधवांना साहित्य व संयंत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)२५ हजार व्यक्तींना चश्मे वाटपगेल्या चार वर्षांत आम्ही ५०० दिव्यांग बांधवांना तिनचाकी सायकली दिल्या असून ३५ हजार व्यक्तींना नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ दिला. त्यातील २५ हजार व्यक्तींना चश्मे वितरित केले असून ४५०० नेत्र रूग्णांवर नि:शुल्क मोतिबिंदू शस्त्रक्रिया केल्या. ५०० विधवा भगिनींना शिवणयंत्राचे वितरण केले. विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करत आम्ही सातत्याने सेवाभाव जपला आहे. येत्या २१ आॅक्टोबर पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करून नागरिकांना नि:शुल्क उपचार व शस्त्रक्रिया करण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना आपण आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आमदार स्थानिक विकास निधीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करून दिव्यांग बांधवांना आमदार निधीतून साहित्य खरेदीसाठी १० लक्ष रुपये खर्चाची तरतूद केली असल्याचे मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.