लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जन्मताच सर्वसामान्यांपेक्षा वेगळा. थोडासा मंदबुध्दी. वय वाढत गेले; मात्र समज येईना. अशातच अचानक मोठ्या भावाचे घराच्या कोपºयात पडित असलेले स्क़ेटींगचे शू हाती आले. या स्केटला गाडीसारखे खेळता खेळताच तो त्यावर केव्हा आरुढ झाला आणि केव्हा रेकॉर्डवर रेकॉर्ड नोंदवित गेला, हे त्याच्या जन्मदात्यांनाही कळले नाही. संघर्षाचा स्वप्नवत प्रवास करणाºया या मुलाचे नाव आहे शिशिर उर्फ ध्रुव. अगदी साडेसहा वर्षांच्या वयातच तो आज स्केटिंगचा जादूगर होऊ पाहत आहे.येथील रहिवासी सुभाष कामडी आणि शिल्पा कामडी यांचा ध्रुव हा लहान मुलगा. ध्रुवची आई आज जगात नाही. आपल्या मुलाच्या संघर्षप्रवासाला ती मधेच सोडून गेली. मात्र ध्रुवचा संघर्ष थांबलेला नाही. ध्रुव दोन वर्षांपर्यंत अॅबनार्मलच होता. त्याला काहीच समजायचे नाही. ध्रुवचा मोठा भाऊ क्षितिज हा स्केटिंग करायचा. मात्र त्याने मध्येच स्केटींग सोडून दिले. त्याचे स्केटींगचे शू घराच्या कोपºयात अडगळीत पडले. ते ध्रुवच्या हाती आले. स्केटला चाके असल्याने तो त्याने गाडी-गाडी खेळू लागला. अशातच एक दिवस त्याने ते पायात घातले आणि त्यावर आरुढ झाला. त्याचे वडील सुभाष कामडी आणि आई शिल्पा हे दोघेही नोकरी करीत असल्याने ते बाहेर असायचे. एक दिवस सायंकाळी घरी परत आल्यानंतर त्यांना ध्रुव अगदी मोठ्या मुलांसारखा नियंत्रितपणे स्केटिंग करताना दिसला. त्यांना आश्चर्याचा अन् तेवढाच सुखद धक्का बसला.तेव्हापासून ध्रुवचा स्केटींगचा प्रवास सुरू झाला. सकाळी एक तास आणि सायंकाळी एक तास तो नियमित स्केटींगचा सराव करतो. आज ध्रुवने स्केटींगमध्ये अनेक पदके पटकाविली आहेत. यादरम्यान दोन महिन्यांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. पुणे येथे आयोजित ‘वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया’ या मॉस खिताबचा भागीदार बनून त्याने आपल्या आईला अनोखी श्रद्धांजली अर्पण केली. ध्रुवच्या नावावर लिंबो स्केटींगमध्ये गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड, गोल्डन बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड व इंडियन अॅचिव्हर बुक आॅफ रेकॉर्ड, स्पीड स्केटींगमध्ये आशिया बुक आॅफ रेकॉर्ड व इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड या नोंदी आहेत. १५ आॅगस्ट २०१५ रोजी सेवाग्राम ते वर्धा स्वराज यात्रा स्केटींग रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. २६ जानेवारी २०१७ रोजी उमरेड जि. नागपूर येथे सलग सात तास स्केटिंग केली. तसेच स्केटींगच्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेत आतापर्यंत त्याने २० गोल्ड, सहा रजत आणि दोन ब्रॉस पदक पटकावले आहे. विशेष म्हणजे, वर्ल्ड रेकॉर्ड युनियन बुकने त्याची दखल घेतली असून जागतिक पातळीवरील पहिल्या १०० रेकॉर्डमध्ये ध्रुवची नोंद झाली आहे.ध्रुव आता सर्वसामान्य होत चालला आहे. आता सहा महिन्यांपूर्वीपासून ठिकठाक बोलता येऊ लागले आहे. सध्या तो येथील बीजेएम अकादमीत पहिल्या वर्गात शिकतो. स्केटींगमध्ये त्याला आणखी मोठे शिखर गाठायचे आहे. आंतरराष्टÑीय स्पर्धेत आपली चुणूक दाखवायची आहे. यासाठी तो जीव ओतून संघर्ष करीत आहे. आई नाही; मात्र वडील सुभाष कामडी भक्कमपणे त्याच्या पाठिशी उभे आहेत.हार्मोनियमचीही आवडध्रुव स्केटींग या खेळ प्रकारात मोठी कामगिरी बजावत असला तरी त्याला आणखी बºयाच गोष्टीत आवड आहे. हार्मोनियम आणि बुद्धीबळ याच्यातही ध्रुवला विशेष रुची आहे. त्यातही काही तरी वेगळे करण्याची त्याची इच्छा आहे.
साडेसहा वर्षांतच तो झाला स्केटिंगचा जादूगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2017 11:44 PM
जन्मताच सर्वसामान्यांपेक्षा वेगळा. थोडासा मंदबुध्दी. वय वाढत गेले; मात्र समज येईना.
ठळक मुद्देआणखी गाठायचेय मोठे शिखर : ध्रुवची अनेक रेकॉर्ड बुकमध्ये नोंदबालक दिन विशेष