लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंबोर यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहिम सुरु केली आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्याभरात कारवाई करीत मागील १४ दिवसात तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त केला़ चौदा दिवसात झालेल्या सोळा कारवायांमध्ये तब्बल ४७ आरोपींना अटक करण्यात आली आहे़ सदर कारवाई ५ ते १८ मे दरम्यान करण्यात आली.जिल्ह्यात दारुबंदी होऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरीसुद्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारुची विक्री केली जात आहे. त्यामुळे अवैध दारुविक्री रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने विशेष मोहिम सुरु केली आहे. या कारवायात तब्बल दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे़ या कारवाईत दारूसाठ्यासह पाच विविध कंपनीच्या महागड्या कार, तीन दुचाकी आणि दोन ट्रकचा समावेश आहे़ ५ मे रोजी चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील शामनगर येथील आंबेडकर चौक परिसरातून २६ हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ १० मे रोजी चंद्रपूर येथील बालाजी मंदिर इरई नदी परिसरात धाड घालून दोन कार आणि साडे चार लाखांची दारू असा एकूण ३५ लाख तीन हजार ५० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़११ मे रोजी चांदाफोर्टच्या मागे बाबूपेठ येथे पाच लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल, १२ मे रोजी गजाननबाबा मंदिर बापटनगर येथे आठ लाख ६४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल, ५ मे रोजी गडचांदूर येथे एक लाख पाच हजार, ६ मे रोजी मूल येथे २९ लाख १८ हजार ५००, ८ मे रोजी चंद्रपूर रामनगर पोलीस ठाणे येथे एक लाख ३९ हजार रुपये, १७ मे रोजी बल्लारपूर पोलीस ठाणे हद्दीत ३५ लाख रुपये, १८ मे रोजी पडोली पोलीस ठाणे हद्दीत तीन लाख ९४ हजार ३०० रुपये, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़घुग्घुसमध्ये दोन लाखांचा दारुसाठा जप्तघुग्घुस : पोलिसांनी चारचाकी वाहनाची तपासणी करुन दोन लाख ३० हजार रुपये किंमतीचा ४० पेटी देशी दारु व चारचाकी वाहन असा सहा लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केली. यावेळी एका व्यक्तीसह अल्पवयीन बालकाला ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली. अमित पाटील (३४) रा. घुग्घुस असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर कारवाई ठाणेदार सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनाखाली उपपोलीस निरीक्षक लांजेवार, विलास निकोडे, चेतमवार, प्रफुल्ल खोब्रागडे आदींनी केली.
१४ दिवसात दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 11:06 PM
अवैध दारुविक्रेत्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंबोर यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहिम सुरु केली आहे.
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : ४७ जणांना अटक