आॅनलाईन लोकमतपाटण : जिल्हाभरात प्रत्येक गावात अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. या अंगणवाडी केंद्रातून बालकांना सुसंस्काराचे धडे दिले जातात; मात्र त्याच अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती नसल्याने बालकांना विद्यार्जनात अडचणी येत आहेत. अनेक गावात अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खोलीत सुरू असून जिल्ह्यातील तब्बल ३१३ अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारत नाही.एका अंगणवाडी केंद्राला भेट दिली असता, अनेक बाबी समोर आल्या. जिवती तालुक्यातील कलघोडी येथे बाराही महिने अंगणवाडी उघड्यावरच भरते. येथे गेल्या २५ वर्षांपासून अंगणवाडी चालविण्यासाठी इमारत नाही. बालकल्याण विभागाने येथे अंगणवाडी सुरू तर केली; परंतु इमारत नसल्याने गेल्या २५ वर्षांपासून लहान बालकांना उन्ह, वारा, पाऊस याचा सामना करावा लागत आहे. आज या अंगणवाडीत प्रेम माने, विजय सिडाम, राजू सिडाम, अजय मडावी, सोनेराव आत्राम, संध्या वैद्य, मनिषा सिडाम, बाली सिडाम, संगीता सिडाम, लैतु सिडाम, सोनू माने, वैष्णव केजगीर, सीमा सिडाम, भीमबाई सिडाम असे १४ विद्यार्थी दाखल आहेत. एकीकडे शासन अंगणवाडीच्या माध्यमातून कुपोषण मुक्तीचा नारा देत आहे. तर दुसरीकडे गेल्या २५ वर्षांपासून अंगणवाडी इमारतीविना भरत आहे.उघड्यावर अंगणवाडी भरत असल्याने पिण्याचे शुद्ध पाणी नाही, चिखलात, थंडीत, उन्हात लहान मुले धडे घेत असून यातून खरच कुपोषण कमी होईल काय, असा प्रश्न विचारला जात आहे.जिवती तालुक्यातील कलघोडी येथे इमारत बांधकामाकरिता सहा लाख ६० हजार रुपये मिळण्याबाबत आम्ही अहवाल पाठविला होता. तो पाच लाख इतका मंजूर झाल्याने निधी कमी पडत आहे. तो वाढवून देण्यासाठी जिल्हा परिषदेला कळविले आहे.- गारुळे, बाल विकासप्रकल्प अधिकारी जिवतीपाटण सर्कलमध्ये येणाºया कलघोडी येथे इमारत बांधकामासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे.- उषा मडावीपर्यवेक्षिका, पाटण सर्कल
इमारतीविना कलघोडी अंगणवाडी भरते उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 11:08 PM
जिल्हाभरात प्रत्येक गावात अंगणवाडी केंद्र सुरू आहेत. या अंगणवाडी केंद्रातून बालकांना सुसंस्काराचे धडे दिले जातात; मात्र त्याच अंगणवाडी केंद्रांना स्वतंत्र इमारती नसल्याने बालकांना विद्यार्जनात अडचणी येत आहेत.
ठळक मुद्देबालकांना अडचणी : इमारत बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष