नेरी येथील गांधी वाॅर्डात सूर्यभान कामडी आणि गोकुलदास शेंडे यांची एकमेकांना लागून घरे आहेत. गोकुलदास शेंडे यांचा मुलगा राकेश शेंडे यांनी मद्यपान मंजूषा सूर्यभान कामडी या महिलेला शिवीगाळ करीत मारहाण केली. तिने मदतीसाठी आरडाओरडा करताच घराशेजारील राजाराम कामडी आणि संघमित्रा विनोद पेठकर यांनी लगेच धावून येत महिलेला सोडविले. महिलेच्या तक्रारीनंतर चिमूर पोलिसांनी रुपेश शेंडे विरुध्द कलम ३५४,२९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करीत अटक केली.
बॉक्स
आरोपी अशक्त असल्याने रुग्णालयात दाखल
आरोपी हा शारीरिक अशक्त असल्याने त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला सशक्त होईपर्यंत उपचारासाठी दाखल करण्याची विनंती केल्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधित कारवाई करून उपचार सुरू आहे. लगेच दोन ते तीन दिवसानंतर अटक करून न्यायालयात हजर करण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक राजू गायकवाड यांनी सांगितले.
110921\img-20210911-wa0244.jpg
घरगुती वादातून महिलेस मारहाण बद्दल चिमूर पोलीस स्टेशन ला लेखी तक्रार दाखल करण्यात आली