शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

चार दिवस लोटूनही तरुणीच्या मृतदेहाची ओळख पटली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2022 11:53 AM

गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.

ठळक मुद्देतरुणी हत्या प्रकरण आता इंटरनेट लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांची तपासाला गती

भद्रावती (चंद्रपूर) : विवस्त्र तरुणीचे धडापासून शिर वेगळे करून तिची हत्या करण्यात आली. या तरुणीचे चार दिवस लोटूनही शिर न मिळाल्याने तरुणी कोण आहे, हेच पोलिसांना कळू शकले नाही. त्यामुळे पोलीस तपासाबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मोबाईल लोकेशन व शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून तपासाला गती मिळाली असून लवकरच प्रकरणाला दिशा मिळणार असल्याचे ठाणेदार गोपाल भारती यांनी सांगितले.

गवराळा शेत शिवारातील परिसरात ४ एप्रिलला २५ वर्षीय तरुणीचा निर्वस्त्र अवस्थेत मुंडके नसलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. ती तरुणी कोण, शहरातील की जिल्ह्याच्या इतर तालुक्यातील की परप्रांतातील याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. या घटनेच्या तपासासाठी पोलीस महासंचालक छेरिंग दोरजे, पोलीस अधीक्षक साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक, अधिकाऱ्यासह जवळपास दोनशे पोलीस तपासाच्या कामी लागले आहेत. वेगवेगळ्या दिशेने तपास चक्रे फिरविण्यात येत असून लवकरच प्रकरणाचा छडा लावण्यात येणार असल्याचे पोलीस विभागातर्फे सांगण्यात येत आहे.

पीएम अहवाल गुलदस्त्यात

मृत तरुणीचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालय चंद्रपूर येथे करण्यात आले असून त्याचा अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हा अहवाल आल्यानंतर पुन्हा तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे. तरुणीवर अत्याचार झाला किंवा नाही, तिचा नेमका मृत्यू कशाने झाला, मृत्यू झाल्यानंतर शिर धडापासून वेगळे केले का, ते या अहवालावरूनच स्पष्ट होणार आहे. सध्या पोलीस विभागाला या अहवालाची प्रतीक्षा आहे.

मृत तरुणीचे शिर धडापासून वेगळे करण्यात आले आहे. ते शिर तिथे कुठेच आढळले नाही. तरुणीचे शिर वेगळे करताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव तिथे होणे अपेक्षित आहे. मात्र, घटनास्थळावर त्या प्रमाणात रक्त आढळले नाही. त्यामुळे या तरुणीची आधी इतरत्र हत्या करून धड घटनास्थळी फेकले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchandrapur-acचंद्रपूर