यामध्ये मृत झालेल्या महिलेचे नाव जिराबाई धोंडुजी कार (६५) तर जखमीचे नाव मनिराम धोंडुजी कार (४५) रा. मांगली असे आहे. तालुक्यातील मांगली येथील रहिवासी असलेले मनिराम कार हे आपल्या आई जिराबाई कार यांच्यासोबत पारडगाव येथील नातेवाईकाच्या घरी लग्न सोहळ्यासाठी गेले होते. लग्न सोहळा आटोपून गावाकडे सायकलने परत येत असतांना ब्रम्हपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील किन्ही गावानजीकच्या जुगनाळा फाट्याकडे सायकलने वळण घेत असताना आरमोरीच्या दिशेने जाणाऱ्या एका इनोव्हा कंपनीच्या चारचाकी वाहनाने सायकलला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये सायकलस्वार मनिराम कार हे जखमी झाले. तर मागे बसलेल्या जिराबाई कार यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक स्वाती फुलेकर या करीत आहेत.
चारचाकीच्या धडकेत महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 4:28 AM