लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : तालुक्यातील रानतळोधी येथील महिला मोहफुल वेचण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून वृद्ध महिलेला ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली.कमलाबाई महादेव नन्नावरे (६०) रा . रानतळोधी असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. आज सकाळी घरची कामे आटोपून ती इतर महिलांसोबत मोहफुल वेचण्याकरिता रानतळोधी जंगल परिसरातील कक्ष क्रमांक २५३ मध्ये गेली होती. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने कमलाबाईवर हल्ला चढविला. यात तिचा जागीच मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच गावकरी, वन विभागाचे कर्मचारी, भद्रावती पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.त्या वाघाची अजूनही दहशत कायमब्रम्हपुरी : बुधवारी तालुक्यातील रामपुरी येथील जानकीराम भलावी यांना वाघाने ठार केले. सायंकाळी मृतकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होत नाही तोच पुन्हा गुरुवारी त्याच वाघाने एका महिलेवर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावकरी अद्यापही कमालीच्या दहशतीत आहेत. एक महिन्यापूर्वी या परिसरातील तीन वाघांना कॉलर आयडी लावली होती. त्यापैकीच एका वाघाने जानकीरामवर हल्ला केल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या कॉलर आयडी लावलेल्या वाघाला पकडण्यासाठी वनविभागाने आज दोन चमू तयार केल्या असून त्याचा ठावठिकाणा शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. वनविभाग सदर वाघाला पिंजऱ्यात बंद करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यादृष्टीने पावले उचलल्या जात आहे. मात्र या परिसरात आणखी काही वाघांचा वावर असल्याने वनविभागाने कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. यासंदर्भात रामपुरी येथील गावकरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याची माहिती रामपुरी ग्रामस्थांनी दिली.
वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 10:26 PM
तालुक्यातील रानतळोधी येथील महिला मोहफुल वेचण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून वृद्ध महिलेला ठार केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता घडली.
ठळक मुद्देवनविभागाची वाघाच्या हालचालीवर नजर