लोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : येथील ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जागोजागी लिकेज असल्याने काही वॉर्डामध्ये गढूळ पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देऊन संताप व्यक्त केला. ४५ हजार लोकसंख्या असलेल्या घुग्घुस गावात वेकोलिच्या कामगार वसाहतीचा काही भाग वगळता पाच लक्ष लिटर क्षमता असलेल्या पाणीपुरवठा योजनेमार्फत ४० वॉल पासून पाणीपुरवठा सुरू आहे. क्रमानुसार दर पाच दिवसात एक तास पाणी पुरवठा होत आहे. दोन वर्षांपूर्वी बोअरवेल दुरूस्ती दरम्यान १९ पाईप, मोटार बोरमध्ये पडली. मात्र त्या बोअरवेल दुरूस्तीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने दोन लाख लिटर क्षमतेची पाणी पुरवठा योजना अजूनही दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहे. पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तर आता ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने नागरिकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
पाण्यासाठी महिलांची ग्रामपंचायतीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2017 12:47 AM