शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
4
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
5
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
7
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
8
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
9
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
10
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
11
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
12
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
13
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
15
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
16
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
17
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
19
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
20
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर

महिलाच समाजातील खऱ्या नायिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 11:10 PM

महिला सफाई कामगार, दारिद्र्य रेषेखालील महिला बचतगट, आॅटोरिक्षा चालविणाऱ्या महिलांचा न.प.द्वारे सत्कार करण्यात आला, हा सत्कार म्हणजे आतापर्यंत माझ्या जीवनात पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी सत्कार होता.

ठळक मुद्देअल्का कुबल : महिला मेळावा

आॅनलाईन लोकमतभद्रावती : महिला सफाई कामगार, दारिद्र्य रेषेखालील महिला बचतगट, आॅटोरिक्षा चालविणाऱ्या महिलांचा न.प.द्वारे सत्कार करण्यात आला, हा सत्कार म्हणजे आतापर्यंत माझ्या जीवनात पाहिलेला सर्वात हृदयस्पर्शी सत्कार होता. या प्रसंगामुळे भारावून गेले. आम्ही केवळ चित्रपटातील नायिका आहोत. समाजातल्या खऱ्या नायिका या सत्कारमुर्ती महिला आहेत, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री अल्का कुबल यांनी महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या.महिला व बालकल्याण समिती, दिअयो-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान नगर परिषदद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा व स्वच्छ भारत अभियानांतर्गत उत्कृष्ठ कार्य करणाºया महिलांचा सत्कार हुतात्मा स्मारक प्रांगणात घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार बाळू धानोरकर तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विनोद जाधव, उपाध्यक्ष प्रफुल्ल चटकी, प्रा. सचिन सरपटवार, सामाजिक कार्यकर्त्या वनिता घुमे, प्रतिभा धानोरकर व नगरसेवक, पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. कुबल म्हणाल्या, स्त्रियांच्या यशामागे कुटुंब असते. सासु-सासरे पाठीशी होते. म्हणूनच मी चित्रपटात कार्य करू शकले. आई-वडिलांची जागा वृद्धाश्रमात नाही. तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयात असली पाहिजे. त्यांनीच तुम्हाला संस्कार शिकविले. तुम्ही आपले सर्वस्व वाहून दिले तरच कुटुंबात आनंदाचे वातावरण राहते असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार प्राप्त उन्नती महिला बचत गट, सफाई महिला कामगार, रिक्षा चालक महिला, विविध महिला बचतगटांचा अल्का कुबल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी जि. प. च्या महिला व बालकल्याण समिती सभापती मीनल आत्राम, सभापती माया नारळे, उपसभापती सीमा पवार, शहर अभियान व्यवस्थापक ज्योती लालसरे, रफीक शेख, सुरेखा आस्वले, नगरसेविका रेखा कुटेमाटे, माधुरी कळमकर, शारदा ठवसे, शोभा सातपुते, शुभांगी उमरे, आशा निंबाळकर, राखी रामटेके, नालंदा पाझारे, सोनिया कामटकर, अर्चना आरेकर, अल्का सातपुते उपस्थित होते. प्रास्ताविक नगराध्यक्ष अनिल धानोरकर तर संचालन सारिका धानोरकर यांनी केले. शेख यांनी आभार मानले.