शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

शिक्षणामुळेच महिला उच्चपदावर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2018 10:40 PM

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना महिलांनी चूल आणि मूल यामध्येच गुरफटून न राहता पुढे यावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच स्व. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या. तर अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत, असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : नवरगाव येथे काँग्रेसचा महिला मेळावा, ज्येष्ठ महिलांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्कनवरगाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देताना महिलांनी चूल आणि मूल यामध्येच गुरफटून न राहता पुढे यावे, यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच स्व. इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होऊ शकल्या. तर अनेक महिला विविध क्षेत्रामध्ये मोठ्या पदावर कार्यरत आहेत, असे प्रतिपादन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले.नवरगाव येथे स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महिला मेळावा व जेष्ठ महिलांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. नितीन कोडवते, जि. प. सदस्य तथा तालुका काँ. कमिटीचे अध्यक्ष रमाकांत लोधे, अ‍ॅड. कविता मोहरकर, प्रबोधनकार तुलसी हिवरे नागपूर, माजी नगराध्यक्ष तथा जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम गडचिरोली, तालुकाध्यक्ष कविता कुंटावार, अरुण कोलते, विनोद लोणकर, दादा चनबनवार, संजय कामडी, शशीकांत जैस्वाल, चंद्रकला बोडणे, विद्या बावणकर, आनंद टिपले, चंद्रभूषण जयस्वाल, ए.शा. निवावे आदी उपस्थित होते.याप्रसंगी परिसरातील जेष्ठ ४० महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार वडेट्टीवार म्हणाले, भारताच्या माजी पतप्रधान इंदिरा गांधी यांनी विविध क्षेत्रात काम करुन प्रगती केली. एक महिला देशाची यशस्वी पंतप्रधान बनू शकते यांचा आदर्श महिलांना घ्यावा, असे ते म्हणाले.नवरगाव आणि परिसरात गोसीखुर्दचे पाणी अद्यापही पोहचले नाही. मात्र २०१९-२० मध्ये गोसीखुर्द धरणाचे पाणी या परिसरात येणारच असा विश्वास व्यक्त केला. या परिसरातील कालव्याच्या सर्व कामाचे टेंडर करण्यास आपण सरकारला भाग पाडले असून पुढील वर्षात पाणी पोहचणार असल्याने आश्वासन आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहराध्यक्ष दीपक चहांदे, संचालन मंदा चौके तर उपस्थितांचे आभार सरपंच अनिता गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाला आनंद मेश्राम, बुधाजी इंदुलवार, संजय सोनकुसरे, उपसरपंच मधुकर गहाणे व वामन बोडणे, नवरगाव काँग्रेस कमेटीचे सर्व पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.