पत्रकार परिषद : कारवाईची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : १९ जून रोजी वनविभागाचे अधिकारी म्हैसकर, क्षेत्र सहाय्यक देऊडकर, तसेच वनविभागाचे इतर कर्मचारी, वनमजूर, वनसमितीचे कर्मचाऱ्यांनी कुठलीही पूर्वसुचना न देता, माझ्या शेतात खड्डे व खोदकाम करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध केला असता, त्यांनी मारहाण करुन माझ्या शेतातील पीकांचे नुकसान केल्याचा आरोप करत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याण्याची मागणी महानंदा येरमे यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.महानंदा येरमे पुढे म्हणाल्या, माझे पती रामाजी येरमे सन १९९५ पासून वनविभागाचे जिमनीवर अतिक्रम करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करती आहे. सन २००६ मध्ये तलाठ्याकडून अतिक्रमण पंजीत नोंद करुन उपविभागीय अधिकारी वरोरा यांच्याकडे अतिक्रमण पट्टे मिळणेबाबत विनंती अर्ज सादर केले. मात्र सदर अर्जावर काहीही कार्यवाही न झाल्याने उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले. शासनाचा निर्णयानूसार जोपर्यंत लाभार्थ्यांच्या हक्काचा निर्णय होत नाही. तोपर्यंत त्यांना वनजमिनीवर बेदखल करता येणार नाही. असे असूनही क्षेत्र सहाय्यक देऊळकर व इतर कर्मचाऱ्यांकडून शेती सोडण्यास दबाव टाकण्यात येत आहे. तर १९ जून रोजी वनविभागाचे अधिकारी म्हैसकर, क्षेत्र सहाय्यक देऊडकर, तसेच वनविभागाचे इतर कर्मचारी, वनमजूर, वनसमितीचे कर्मचारी मी माझ्या शेतात काम करत असताना आले. माझ्या शेतात खड्डे व खोदकाम करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध केला असता, त्यांनी मला पाठीवर, लाथा- बुक्क्यानी मारहाण करुन माझ्या शेतातील पीकांचे नुकसान केले, असा आरोप महानंदा येरणे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याण्याची मागणी महानंदा येरमे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून महिलेस मारहाण
By admin | Published: June 27, 2017 12:48 AM