बल्लारपूर : स्त्रीचा सेल्फ डिफेन्स पॉवर जर मजबूत असेल तर त्या स्त्रीवर कितीही संकट कोसळले तरी ती आपले संतुलन डगमगू देत नाही. स्त्रियांवर फार मोठी जबाबदारी सांभाळण्याची वेळ आली आहे. ती फक्त एकाच कुटुंबावर अवलंबून नसून दोन कुटुंबाचा सांभाळ करून समोरील वाटचाल करीत आहे, असे प्रतिपादन लंडनच्या थेम्स वैली यांनी केले. हिंदी अध्यापक संघ चंद्रपूरकडून आयोजित आंतराष्ट्रीय वेबिनारच्या माध्यमातून त्या बोलत होत्या.
या सेमिनारमध्ये प्रा. फिरोज कुरेशी यांनी आपल्या सेल्फ काॅन्फिडेन्सचे महत्त्व सांगितले. या वेबिनारला महाराष्ट्र राज्य हिंदी अध्यापक संघाचे अध्यक्ष डॉ. कांबळे, राज्य कार्याध्यक्ष डॉ. कर्डिले, नागपूर विभागाध्यक्ष प्रा. डोमकावळे, प्रा. जावेद शेख, चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीचे अध्यक्ष प्रा. सुशील भाटिया, उपाध्यक्ष नीता तंगडपल्लीवार, प्रा. सुन्नी सिंग, प्रा. जमदाडे यांनी मार्गदर्शन केले. संचालन प्रा. सुन्नी सिंग यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सुशील भाटिया यांनी व आभार प्रदर्शन प्रा. वैशाली मद्दीवार यांनी केले.