शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Published: September 25, 2016 1:11 AM

शेतात काम करण्यासाठी गेलेल्या रेखा हरीदास गुरनुले (४०) रा. सायगाव यांच्यावर वाघाने हल्ला चढवून

तत्काळ मदत : सायगाव येथील घटनाब्रह्मपुरी : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या रेखा हरीदास गुरनुले (४०) रा. सायगाव यांच्यावर वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना काल शुक्रवारला सायंकाळी घडली आहे.ब्रह्मपुरी वनविभागात काल रेखा हरिदास गुरनुले रा. सायगाव शेतीकाम करण्यासाठी गेल्या होत्या. परंतु बराचसा वेळ होऊनही त्या घरी परत न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली व याबाबतची माहिती दक्षिण ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील क्षेत्र सहायक, आवळगाव व उत्तर ब्रह्मपुरी क्षेत्र सहाय्यक दिली. माहिती प्राप्त होताच दोन्ही क्षेत्रसहायक व त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांनी ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील नवेगाव उपक्षेत्रातील मुरपार नियत क्षेत्रातील कक्ष क्रमांक २०७ मध्ये शोध घेतला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्यात आली. त्यानंतर सहायक वनसंरक्षक (जमीन व कॅम्प), दक्षिण ब्रह्मपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी हे वनकर्मचाऱ्यासह घटनास्थळी हजर झाले. यावेळी पोलीस निरीक्षक ओ.पी. अंबाडकर व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. रात्री उशिरा मृत महिलेचे शव ब्रह्मपुरीच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणण्यात आले. वनविभागाचे सहायक वनसंरक्षक गिता नन्नावरे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादे) आशा चव्हाण, जि.प.सदस्या मडावी व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रभाकर सेलोकर यांच्या उपस्थितीत वनविभागाच्या वतीने मृताच्या कुटुंबांना २५ हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात आली. ज्या भागात हा प्रकार घडला, त्या ठिकाणाची पाहणी केली असता वाघाचे पगमार्क आढळून आले. त्यामुळे वनविभाग या वाघावर नजर ठेवून आहे. असे असले तरी नवेगाव, सायगाव परिसरात वाघाची दहशत दिवसेंदिवस वाढत असल्याने गावकरी भयभीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)