शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
2
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
3
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
4
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
5
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
6
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
7
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
8
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
9
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
10
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
11
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
12
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
13
संगीता ठोंबरेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; राज्य पातळीवर मिळाली मोठी जबाबदारी!
14
'हंटर' मधील बोल्ड सीन्सवर सई ताम्हणकरचं भाष्य; म्हणाली, "कुटुंबियांना पचलंच नव्हतं पण..."
15
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
16
कमाल! IAS, IPS न होता वयाच्या २१ व्या वर्षी झाली मोठी अधिकारी; कोचिंगशिवाय पास केली UPSC
17
सेटवर शूटिंगदरम्यान सुनील शेट्टी जखमी, अ‍ॅक्शन सीन करताना बसला मार! आता प्रकृती कशी?
18
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
19
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
20
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण

महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घ्यावी -वैशाली डोळस; भद्रावती येथे स्त्रीमुक्ती परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 5:41 PM

आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत.

भद्रावती(चंद्रपूर) : आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो. परिवर्तनवादी चळवळीतील पुरुषसुद्धा घरात समतेने वागत नाहीत. त्यामुळे महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घेऊन सर्व प्रकारची गुलामगिरी झुगारावी, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारवंत वैशाली डोळस यांनी व्यक्त केले. भद्रावती येथे तालुका भारीप बहुजन महासंघाच्या वतीने पार पडलेल्या स्त्रीमुक्ती परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मोनालीसा देवगडे यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. मंचावर स्वागताध्यक्ष सीमा ढेंगळे, भारीप बमसंचे वर्धा व यवतमाळ जिल्हा पक्ष निरीक्षक कुशल मेश्राम, रोहीत वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला, गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे, कपूर दुपारे, भामसं जिल्हाध्यक्ष जयदीप खोब्रागडे, जिल्हा महिलाध्यक्ष लता साव, सुरज गावंडे, सुनील खोब्रागडे, धीरज बांबोळे, सेवचंद्र नागदेवते, कविता गौरकर, अविंता उके, कल्पना अलोणे, निशा ठेंगरे, तनुजा रायपुरे, लता टिपले, रजनीकुंदा रायपुरे, माया देवगडे, निर्मला शिरसाट, माया महाकुलकर, राजा वेमुला, पद्मा इलन दुल्ला आदी उपस्थित होते. एकदिवसीय स्त्रीमुक्ती परिषदेत विविध सत्रांमध्ये महिलांच्या मूलभूत प्रश्नांची मांडणी करण्यात आली. महिलांच्या राजकीय व सामाजिक सक्षमीकरणासंदर्भात  चळवळीच्या अभ्यासक तसेच कार्यकर्तींनी सम्यक मांडणी करून आंदोलनाची गरज व्यक्त केली. रजनीकुंदा रायपुरे, पौर्णिमा पाटील, सीमा ढेंगळे, लता साव, जयदीप खोब्रागडे, कुशल मेश्राम,  आदींनीही मार्गदर्शन केले. लोकशाहीर बाबुराव जुमनाके यांनी ‘जन बदल घालूनी धाव’ हा संगीतमय, तर औरंगाबाद येथील लोकशाहिर मेघानंद जाधव यांनी आंबेडकरी जलसा सादर केला. संचालन राखी रामटेके व प्रास्ताविक लता टिपले यांनी केले. वैशाली चिमूरकर यांनी आभार मानले.                             

हिंदू धर्म सोडणार - राधिका वेमुलारोहित वेमुला यांच्या मातोश्री राधिका वेमुला म्हणाल्या, भारताला गुलाम बनवण्यात मनुस्मृतीचा मोठा हात आहे. आपण सगळ्यांनी डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी चालले पाहिजे. मनुस्मृती महिलांना गुलाम बनविते. त्यामुळे तिचे पालन का करायचे? समानता नाकारणाºया  मनुुस्मृतीचे दहन योग्यच असून, मी हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे.

सरकारी यंत्रणेचा गैरवापर - स्मिता पानसरेअलीकडच्या काळात सत्ताधा-यांकडून लादली जाणारी नवीन मनुस्मृती अधिक घातक आहे. पुराणमतवादी विचारांची मंडळी घटनाद्रोही राजकारण करीत आहेत. शिवाय, सत्ताधारी वर्ग सरकारी यंत्रणांचा गैरवापर करीत आहेत. हा प्रकार बंद झाला पाहिजे, असे  मत  अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्या कन्या स्मिता पानसरे यांनी व्यक्त कले.  चौदा ठराव पारितस्त्रीमुक्ती परिषदेत चौदा ठराव पारित करण्यात आले. २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा, मनुस्मृतीवर बंदी घालावी, त्याचा पुरस्कार करणे कायद्यानुसार गुन्हा ठरवावा, स्वयंघोषित गोरक्षकांवर कडक कारवाई करावी, अंगणवाडीतार्इंच्या मानधनात वाढ करावी आदींसह अन्य महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश आहे.