लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : बाबा आमटे यांच्या कार्याने प्रेरित होऊन कुष्ठरोग्यांमध्ये आत्मभान जागृत करण्यासाठी व महिलांना आत्मनिर्भर करून त्यांच्या सक्षमीकरणासाठी पनवेल ते आनंदवनपर्यंत सुमारे ८०० किलोमीटर सायकलयात्रेवर निघालेल्या दोन महिला यात्रेकरू आनंदवनमध्ये पोहचल्या असून महारोगी सेवा संस्था व आनंदवन मित्र मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.कांदिवली (मुंबई) येथील महिला बाल विकास विभागात लेखाधिकारी असलेल्या सविता ननोरे व पनवेल येथील सुनिता रामचंद्र या महिलांनी बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी १६ जानेवारीला चारकोप, कांदिवली मुंबई येथून सायकलने निघाल्या. पनवेलला पोहचून १७ जानेवारी ते २५ जानेवारी २०२० असा ९ दिवसांचा प्रवास करून त्या वरोऱ्यात दाखल झाल्या आहे.आनंदवनमध्ये पोहचताच आनंद मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, सचिव राजेंद्र मर्दाने, पदाधिकारी राहुल देवडे यांनी त्यांची भेट घेतली. तत्पूर्वी त्यांचे महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे, सीईओ डॉ. शीतल आमटे करजगी, प्राचार्य डॉ. मृणाल काळे, प्राचार्य डॉ. सुहास पोद्दार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आनंदवन येथील विशेष शिक्षक दीपक शिव, संधी निकेतनचे अधीक्षक रवींद्र नलगिंटवार,जगदीश दिवटे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
कुष्ठरोग जागृतीसाठी महिलांचा आठशे किमीचा सायकल प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 1:15 AM
कांदिवली (मुंबई) येथील महिला बाल विकास विभागात लेखाधिकारी असलेल्या सविता ननोरे व पनवेल येथील सुनिता रामचंद्र या महिलांनी बाबा आमटे यांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यासाठी १६ जानेवारीला चारकोप, कांदिवली मुंबई येथून सायकलने निघाल्या. पनवेलला पोहचून १७ जानेवारी ते २५ जानेवारी २०२० असा ९ दिवसांचा प्रवास करून त्या वरोऱ्यात दाखल झाल्या आहे.
ठळक मुद्दे१६ जानेवारीपासून यात्रा : आनंदवन मित्र मंडळातर्फे सत्कार