लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महिलांनी पंरपरेच्या कोषात न राहता शिक्षणातून येणाऱ्या आधुनिक जीवन मूल्यांची कास धरावी, असे प्रतिपादन मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे यांनी केले. महिला राजसत्ता आंदोलन व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने कारभारणी प्रशिक्षण अभियानअंतर्गत महिला सरपंचांसाठी कायदेविषयक कार्यशाळेत त्या बोलत होत्या.प्रमुख पाहुणे म्हणून प्रकृती महिला विकास केंद्र संचालिका भारती रामटेके, महाराष्टÑ राज्य महिला आयोग जिल्हा समन्वयक वैशाली घुमे, महिला राजसत्ता आंदोलनच्या राज्य नियंत्रक मालती सगणे, निलेश देवतळे, राजेश पिंजरकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. महिला कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ या विषयावर भारती रामटेके यांनी मार्गदर्शन केले. वैशाली घुमे यांनी कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार यावर विचार मांडले.महिला सरपंच, लोकप्रतिनिधींचे अधिकार, कर्तव्य व जबाबदाºया व प्रभावी कारभारासाठी प्रशिक्षण संधी यावर मालती सगणे यांनी मार्गदर्शन केले. गावाचा कारभार करताना कोणकोणत्या युक्त्या वापराव्या व विकास योजनांचे स्वरूप याविषयी निलेश देवतळे यांनी माहिती दिली. महाराष्टÑ राज्य महिला आयोगाचे कार्य गावपातळीपर्यंत नेण्याकरिता व महिलांवर होणाºया अन्याय, अत्याचाराच्या विरोधात विविध कायद्यांची माहिती महिला लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून गावात पोहोचविण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. मान्यवरांनी विविध पैलुंवर भाष्य केले. संचालन वंदना जांभुळकर यांनी केले. आभार जयश्री कुमरे यांनी मानले. चंद्रपूर, बल्लारपूर, पोंभूर्णा, नागभीड, चिमूर, वरोरा तालुक्यातील महिला सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य सदस्य भारती राजूरकर, नंदा खोब्रागडे, मंगला घटे, विकास हुमणे, सुरेखा आत्राम उपस्थित होते.
महिलांनी आधुनिकतेची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 11:02 PM
महिलांनी पंरपरेच्या कोषात न राहता शिक्षणातून येणाऱ्या आधुनिक जीवन मूल्यांची कास धरावी, असे प्रतिपादन मनपाच्या महिला व बालकल्याण सभापती जयश्री जुमडे यांनी केले. महिला राजसत्ता आंदोलन व महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या संयुक्त विद्यमाने कारभारणी प्रशिक्षण अभियानअंतर्गत महिला सरपंचांसाठी कायदेविषयक कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
ठळक मुद्देजयश्री जुमडे : महिला सरपंचांसाठी कायदेविषयक कार्यशाळा