शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
3
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
6
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
7
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
8
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
9
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
10
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
11
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
12
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
13
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
14
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
15
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
16
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
17
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
18
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
19
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
20
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...

‘त्या’ महिलांची न्यायालयातून जामिनावर सुटका

By admin | Published: July 14, 2014 11:51 PM

पोंभुर्णा येथील पालकमंत्री संजय देवतळे यांच्या सभेत दारूबंदीबाबत जाब विचारायला गेलेल्या महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल असलेल्या महिलांची सोमवारला चंद्रपूर न्यायालयातून

चंद्रपूर : पोंभुर्णा येथील पालकमंत्री संजय देवतळे यांच्या सभेत दारूबंदीबाबत जाब विचारायला गेलेल्या महिलांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. गुन्हे दाखल असलेल्या महिलांची सोमवारला चंद्रपूर न्यायालयातून जामिनावर सुटका करण्यात आली.चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीची सतत मागणी होत असतानाही या मागणीच्या पुर्ततेसाठी शासनाकडे गांभीर्याने विषय नेला नाही, असा आरोप महिलांचा पालकमंत्र्यांवर होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे निमित्त साधून पोंभुर्णा येथे कार्यक्रमात पालकमंत्री भाषण देत असताना महिलांनी ‘दारूबंदीसाठी महिला जेलमध्ये जात असताना तुम्ही कुठे होता, चंद्रपूर जिल्हा दारूबंदी कधी होणार’ असा जाब त्यांना विचारला. पोलिसांनी जाब विचारणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले. गुन्हे दाखल केले. मात्र तब्बल पाच महिन्यानंतर पोलिसांनी या महिलांना अटक करून चंद्रपूर न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या महिलांची जामिनावर सुटका केली.मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २ एप्रिलला क्लब ग्राऊंड येथील जाहीर सभेत ‘लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्हा दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल’ असे जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी आपले आश्वासन अद्याप पुर्ण केले नाही. मात्र दारूबंदी करणाऱ्या महिलांवर अटकेची कारवाई केली आहे. शासनाने दारूबंदी आंदोलनसंदर्भात गुन्हे मागे घेण्याचे शासन निर्णय जाहीर केले आहे. मात्र त्याचे पालन नाही.(शहर प्रतिनिधी)