शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

कोरोनाने कुंकू पुसलेल्या महिलांना मिळाला आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2021 4:32 AM

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे विधवा बनलेल्या महिलांना आर्थिक ताण पडू नये, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी संजय गांधी निराधार ...

चंद्रपूर : कोरोना संकटामुळे विधवा बनलेल्या महिलांना आर्थिक ताण पडू नये, त्यांचे जगणे सुसह्य व्हावे यासाठी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभ दिला जात आहे. याअंतर्गत आजपर्यंत जिल्ह्यात २०५ महिलांना लाभ मिळाला आहे. अन्य महिलांचेही प्रस्ताव दाखल झाले असून तालुकास्तरीय समिती यावर निर्णय घेणार आहे. लाभ मिळत असल्यामुळे काही प्रमाणात का होईना, पडत्या काळात या विधवा महिलांना दिलासा मिळाला आहे.

कोरोनामुळे पतीचे अकाली निधन झाल्यामुळे अशा महिलांवर आभाळ कोसळले आहे. अनेकींच्या वाट्याला हालअपेष्टा आल्या आहेत. विविध समस्यांचा सामना करीत त्या जीवन जगत आहेत. यातील प्रत्येकीचीच आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. या महिलांना आधार मिळावा यासाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून मानधन देणे सुरू केले आहे. शासकीय निकषांमध्ये बसत असलेल्या विधवा महिलांना हा लाभ दिला जात आहे. त्यामुळे कठीण काळामध्ये या शासकीय आधारामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. विशेष म्हणजे, २०५ महिलांना आधार मिळाला असला तरी, अन्य महिलांनाही लाभ मिळावा यासाठी शासकीय स्तरावर कागदपत्रे गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले असून त्याही महिलांना लाभ मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

बाॅक्स

तालुकानिहाय महिला

चंद्रपूर तालुका - ०८

चंद्रपूर मनपा - ०३

वरोरा - ०४

कोरपना - ३१

नागभीड - १६

ब्रम्हपुरी - २२

सिंदेवाही - ०४

राजुरा - १६

जिवती - ०३

मूल - ०७

गोंडपिपरी - १०

भद्रावती - १२

सावली - ४०

चिमूर- १४

बल्लारपूर - १४

पोंभुर्णा - ०४

एकूण - २०५

--

बाॅक्स

राष्ट्रीय कुटुंब कल्याण योजनेतून अल्पगटातील विधवा महिलांना एकदाच २० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. यासाठी संबंधित महिलांना पतीच्या निधनानंतर तीन वर्षाच्या आत प्रशासनाकडे अर्ज सादर करावा लागतो.

कोट

विधवा तसेच निराधार असलेल्या महिलांना शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांच्या माध्यमातून त्यांना लाभ दिला जातो. महिलांनी संबंधित तहसील कार्यालयामध्ये अर्ज सादर करावा. समितीने अर्ज मान्य केल्यानंतर दर महिन्याला संबंधित महिलांना मानधन दिले जाते.

- डाॅ. कांचन जगताप

तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर

बाॅक्स

अशी लागणार कागदपत्रे...

कुटुंबाचा उत्पन्न दाखला

रहिवासी दाखला

वयाचा दाखला

पतीच्या मृत्यूचा दाखला

बाॅक्स

येथे करा अर्ज...

अर्जदाराने शासन निर्णयानुसार आर्थिक साहाय्य मिळविण्यासाठी निर्धारित केलेला अर्ज भरावा. ज्या ठिकाणी राहत असेल, त्या भागातील संबंधित तलाठ्याकडे अर्ज सादर करावा.

बाॅक्स

या आहेत योजना...

संजय गांधी निराधार अनुदान योजना

संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जाती)

संजय गांधी निराधार अनुदान योजना (अनु. जमाती)

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना