केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे गरिबांना सिलिंडर घेणे कठीण झाले. मोदी सरकार शेजारच्या नेपाळ, भूतान, बांगलादेशला ३० रुपये प्रति लीटर पेट्रोल व २२ रुपये प्रति लीटर डिझेल देत आहे. मात्र, आपल्याच नागरिकांना पेट्रोल व डिझेलसाठी १०४ रुपये मोजावे लागतात. मोदी सरकारने केलेल्या कृत्रिम महागाईने वाहतुकीसह इतर वस्तूंचेही दर वाढले. त्यामुळे सामान्य माणसाचे जगणे कठीण झाल्याचा आरोप आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या वेळी केला. आंदोलनात महिला प्रदेश सचिव नम्रता आचार्य-ठेमस्कर, महिला ग्रामीण अध्यक्ष चित्रा डांगे, महिला शहर अध्यक्ष सुनीता अग्रवाल, शहर जिल्हा अध्यक्ष रामू तिवारी, नगरसेविका सुनीता लोढिया, स्वाती त्रिवेदी, मीनाक्षी गुजरकर, लता बारापात्रे, शीतल कातकर, वाणी दरला, हर्षा चांदेकर, सुनीता धोटे, बोर्डाच्या सरपंच यशोदा खामनकर, वरोरा महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष रत्नमाला अहिरकर, प्रिया भोयर, प्रतिमा कातकर, प्रतिभा जीवतोडे, भाग्यश्री इंगळे, गोपिका परचाके, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, मोहन डोंगरे, कुणाल चहारे, पितांबर कश्यप आदी सहभागी झाले होते.
महागाईविरोधात महिला काँग्रेस रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 4:20 AM