शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

राष्ट्रसेविका समितीतर्फे महिलांचा दसरा उत्सव

By admin | Published: October 22, 2015 12:50 AM

राष्ट्रसेविका समिती नगर शाखा नवरगावच्या वतीने शस्त्रपूजन व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात भारत विद्यालयाच्या पटांगणावर साजरा झाला.

नवरगाव : राष्ट्रसेविका समिती नगर शाखा नवरगावच्या वतीने शस्त्रपूजन व दसरा उत्सव मोठ्या उत्साहात भारत विद्यालयाच्या पटांगणावर साजरा झाला.सदर महिलांच्या दसरा उत्सवाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सरपंच अनिता गायकवाड तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रतिभा नानोटी, मृणाल बोरकर आदी मंचावर उपस्थित होते. जयंत बोरकर यांच्या वाड्यातून राष्ट्रसेविका समितीची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने निघाली. कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते शस्त्राचे व प्रतीमांचे पूजन करण्यात आले.यावेळी बोलताना प्रतिभा नानोटी म्हणाल्या, चांगल्या कामाची सुरूवात या दिवशी केली जात असून विजय दिवस म्हणून महत्त्व आहे. राष्ट्रसेविका समिती विकासाच्या कार्याने प्रेरीत झाली असून हिंदू म्हणून या देशात रामराज्य आणायचे आहे. आतंकवाद, पराभव ही भावना नष्ट झाली पाहीजे. ८० वर्षांपासून ही समिती कार्यरत असून स्त्री शक्ती, एकत्र काम करण्याची प्रवृत्ती, राष्ट्रीय एकात्मता शिकवित असून संस्कृतीचे जतन केले पाहिजे. आपण तेजस्वी भारताचे नागरिक असून निसर्गाप्रमाणे आपणातही चांगले गूण आहेत ते ओळखण्याची गरज आहे. हे चांगले गुण समाजापर्यंत पोहचविण्याचे आवाहन यावेळी केले. राष्ट्रसेविका समितीच्या सदस्यांनी विविध योग सादर केले. वैयक्तीक गीत सुनंदा बाकरे, श्लोक नंदनवार यांनी सादर केले. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून नवरगाव येथील सैथिक कुंभरे यांना गडचिरोली येथे विरमरण आले, त्यांच्या मातेचा सत्कार करण्यात आला. तसेच येथील दोन व्यक्ती सैन्यामध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याही मातांचा सत्कार करण्यात आला. संचालन नंदनवार यांनी केले. (वार्ताहर)