पाणी पुरवठा समितीची निवड नियमबाह्यवरोरा : शहराला लागून असणाऱ्या बोर्डा ग्राामपंचायत गेल्या एक वर्षांपासून चांगलीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मागील एका वर्षांपासून पाणी पुरवठा समिती गठीत झाली नाही. या वादातूनच एका सचिवाला निलंबितही व्हावे लागले. आज १६ जुलैला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत पाणी पुरवठा समितीची निवड करण्यात आली. परंतु ती नियमबाह्य असल्याचा आरोप करीत शेकडो महिलांनी निवड समितीच्या विरोधात एल्गार पुकारला.शेकडो ग्रामस्थांनी पंचायत समिती गाठून निवड प्रक्रिया नियमाबाह्य असून निवड करण्यात आलेली समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली.पाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी पाणी पुरवठा समितीची निवड केली जाते. मात्र बोर्डा ग्रामपंचायतीत मागील एक वर्षांपासून ही निवड प्रक्रिया या ना त्या कारणामुळे व ग्रामस्थांच्या आक्षेपामुळे रखडत आहे. अनेकदा यातून वादही झाले आहे. त्यामुळे ही निवड प्रक्रिया पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात तसेच गुप्त मतदान पद्धतीने व्हावी, अशी मागणी गावातील महिलांनी एका निवेदनातून संवर्ग विकास अधिकारी यांना केली होती. ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी ग्रामपंचायतीला १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने अनेक गाव पुढाऱ्याचे लक्ष ग्रामपंचायत उपसमिती व पाणी पुरवठा समितीकडे लागले आहे. त्यातूनच वाद होत आहेत. आज शनिवारी बोर्डा ग्रामपंचायतीत पाणी पुरवठा समिती निवड करण्यासाठी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेचा अध्यक्ष हा नागरिकांमधून निवडण्याचा नियम असतानाही उपसरपंच धनराज आसूटकर व राजू मिश्रा यांनी संगणमत करून बाहेर गावातील बोगस मतदार आसूटकर यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, असा आरोप नागरिक करीत आहेत. ग्रामपंचायत सदस्य किंवा पदाधिकारी यांना ग्रामसभेचे अध्यक्ष बनविता येत नसतानाही उपसरपंचांना बोगस मतदान करून केलेली ही निवड रद्द करण्याची मागणी ओम मांडवकर, यशवंत सायरे, प्रशांत डाहुले, अनिता देशट्टीवार, जितेंद्र कांबळे व शेकडो ग्रामस्थांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)
बोर्डा ग्रामपंचायतीच्या विरोधात महिलांचा एल्गार
By admin | Published: July 17, 2016 12:39 AM