भंगार वाहनांमुळे जागा व्यापली
चंद्रपूर : चंद्रपूर शहर तसेच रामनगर पोलीस स्टेशनमध्ये मोठ्या प्रमाणात भंगार वाहने जप्त करून ठेवण्यात आले आहे. मात्र या वाहनामुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली असून येणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे येथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
व्यावसायिकांना हवे ओटे
चंद्रपूर : येथील वडगाव परसरातील काही रस्त्यावर शेजारील गावातून येणारे शेतकरी भाजीपाला विक्री करतात. मात्र त्यांना बसण्यासाठी योग्य जागाच नाही. परिणामी ते रस्त्याच्या कडेला भाजीपाला विक्री करतात. त्यामुळे या व्यावसायिकांना जागा उपलब्ध करून ओटे तयार करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
गोल बाजारातील अतिक्रम हटवावे
चंद्रपूर : येथील गोल बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे बाजारातील व्यावसायिकांचे अतिकमण हटवून रस्त्ये मोकळे करणे गरजेचे आहे.
अंचलेश्वर गेटची डागडुजी करावी
चंद्रपूर : येथील अंंचलेश्वर गेट तसेच परिसराची काही प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे पुरातत्व विभागाने लक्ष देवून दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी इतिहास प्रेमींनी केली आहे.
एटीएम केंद्रात कचराचंद्रपूर : शहरात विविध बॅंकांनी एटीएम केंद्र सुरु केले आहे. काही एटीएमची नियमित स्वच्छता होत असली तरी काही केंद्रात कचऱ्याचे ढिगारे बघायला मिळत आहे. त्यामुळे या केंद्राची नियमित तपासणी करून ग्राहकांना दिलासा देणे गरजेचे आहे.
रामनगर येथील अतिक्रमण हटवावे
चंद्रपूर : सेटं मायकल हायस्कूल ते वरोरा नाकाकडे येणाऱ्या रस्त्याचे नव्यानेच रुंदीकरण तसेच सिमेंटीकरण करण्यात आले आहे. मात्र काही व्यावसायिकांनी अतिक्रमण करून रस्ताच बळकावला आहे. परिणामी वाहन धारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करण्याची मागणी केली जात आहे.
सौंदर्यीकरण त्वरित करावे
चंद्रपूर : शहरातील काही चौकांचे सौंदर्यीकरण करण्यात आले असून काही चौकांच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरुच आहे. त्यामुळे या चौकांचेही काम त्वरित करावे, अशी मागणी केली जात आहे.
वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी
चंद्रपूर : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत वाहतूक पोलिसांची संख्या कमी असल्यामुळे कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या वाढवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी मदत घ्यावी, अशी मागणी केली जात आहे.
घरमालकांना पट्टे द्यावे
चंद्रपूर : शहरात अनेक भागामध्ये नागरिक नझुलच्या जागेवर अतिक्रमण करून रहात आहे. या नागरिकांना नियमित पट्टे देऊन त्याचा प्रश्न कायम निकाली काढावा, अशी मागणी केली जात आहे.