यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते. नोडल ऑफिसर रोहन घुगे, आरोग्य अधिकारी आविष्कार खंडारे, माजी नगरसेवक बलराम डोडाणी आदी उपस्थित होते. कोरोनाग्रस्त रुग्णांची गैरसोय टाळत त्यांना योग्य उपचार देता यावा, याकरिता महानगरपालिकेने सर्व सोई सुविधायुक्त १०० खाटांचे कोविड रुग्णालय उभारावे, अशा सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या. याकरिता आमदार किशोर जोरगेवार यांनी आमदार विकास निधीतील एक करोड रुपयांचा निधी मनपा प्रशासनाकडे वळता केला होता. तसेच चंद्रपुरातील उद्योगांनी सामाजिक दायित्व निधी दिल्याने वन अकादमी येथे रुग्णालयाचे काम सुरू करण्यात आले आहे. रुग्णालय सुरू होणार असलेल्या वन अकादमी येथील इमारतीतील अनेक कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे हे कामे पूर्ण करण्याच्या दिशेने युध्दपातळीवर प्रयत्न केल्या जात आहे. येथील लाईट फिटिंग, ऑक्सिजन पुरवठा यासाह इतर महत्त्वाची कामे सध्या सुरू असून येत्या काही दिवसातच हे रुग्णालय कोरोना रुग्णांच्या सेवेत उपलब्ध होणार आहेत.
ऑक्सिजनयुक्त शंभर बेडच्या कोविड रुग्णालयाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:36 AM