लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे शासनस्तरावर विविध उपाययोजना केल्या जात आहे. धोका टाळण्यासाठी५५ वर्षावरील शिक्षक तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या तसेच महिला शिक्षकांना वर्क फॉर होमचे आदेश असतानाही चंद्रपूर पंचायत समितीसह जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात या शिक्षकांनाही बोलाविल्या जात आहे. एवढेच नाही तर येण्याची सक्तीही करण्यात आली आहे. त्यामुळे या शिक्षकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून वर्क फॉर होमची सुविधा उपलब्ध करून देण्याचे पत्रही पाठविले आहे.राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे शाळा सुरु न करता केवळ शैक्षणिक वर्ष सुरु केले आहे. दरम्यान, शाळेत गर्दी वाढू नये यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहे. विशेष म्हणजे, महिला शिक्षक शिक्षक, आजारी तसेच ५५ वर्षांवर असलेल्या शिक्षकांना शाळेत बोलावू नये, असे आदेश असतानाही काही पंचायत समिती तसेच मुख्याध्यापक काम नसतानाही शिक्षकांना शाळेत बोलावित आहे.शाळेत शिक्षकांना बोलविण्यांसदर्भात मुख्याध्यापकांनी नियोजन करताना एकाच वेळी सर्व शिक्षक जमा होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी, अशी सूचनाही देण्यात आल्या आहेत. असे असतानाही शिक्षकांना बोलावून शाळेत बसवून ठेवल्या जात असल्याचे काही शिक्षकांचे म्हणणे आहे. विनाकारण त्रास देण्याचा प्रकार काही मुख्याध्यापक करीत आहे. विशेष म्हणजे, महिला शिक्षकांनाही काम नसतानाही गुंतवून ठेवल्या जात आहे. यासंदर्भात जिल्ह्यातील बहुतांश शिक्षक त्रस्त झाले आहे.या शिक्षकांना द्यावी लागेल सूटमहिला शिक्षिका, मधुमेह, श्वसनाचे विकार, रक्तदाब, हृदयविकार आणि ५५ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या शिक्षकांना शाळेत बोलविण्यात येऊ नये, असे शासन निर्देश आहे. शाळा सुरळीत सुरु होतपर्यंत त्यांना वर्क फ्रॉम होम या पद्धतीने कामे देण्यात यावे असे शासनाचे निर्देश आहे.
जबाबदारीतून शिक्षकांची मुक्तताराज्यातील अनेक शिक्षकांना कोरोनाचे सर्वेक्षण आणि इतर विविध जबाबदाºया देण्यात आल्या आहेत. शिक्षकांना या जबाबदारीमधून मुक्त करण्याचे आदेश शिक्षणाने दिले आहेत. यासंदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र अद्यापही शिक्षकांना मुक्त करण्यात आले नाही.
शिक्षण उपसंचालकांनी पाठविले पत्र५५ वर्षावरील तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या शिक्षकांना आणि महिला शिक्षकांना वर्क फॉर होमची सवलत द्यावी यासंदर्भात शासनाचे आदेश असतानाही पुन्हा ३० सप्टेंबररोजी नागपूर विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून सवलत देण्याचे सांगितले आहे.