बॉक्स
सिंदेवाहीत नगरपंचायत येथे निषेध
फोटो
सिंदेवाही : ठाणे महानगरपालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे व त्यांच्या सुरक्षा रक्षकावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा महाराष्ट्र राज्य नगरपरिषद नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटना सिंदेवाही यांनी जाहीर निषेध केला. सिंदेवाही नगरपंचायतची कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून ‘काम बंद आंदोलन’ केले. मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या नेतृत्वात तहसीलदार गणेश जगदाळे यांना निवेदन देण्यात आले. पंकज आसेकर, लेखापाल अमोल पाटील, संवर्ग कर्मचारी अध्यक्ष रामटेके निकुरे, सुधीर ठाकरे, विनोद काटकर तसेच नगरपंचायतीचे संपूर्ण कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
--------
फोटो
नागभीडमध्ये तहसीलदारांना निवेदन
नागभीड : ठाणे मनपा सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील प्राणघातक भ्याड हल्ल्याचा नागभीड येथे निषेध करण्यात आला. हल्लेखोर गुन्हेगारांवर त्वरित कारवाई करावी, या मागणीसाठी नागभीड नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांच्यावतीने काळ्या फिती लावून तहसीलदार नागभीड व नगराध्यक्ष नगरपरिषद नागभीड यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लक्ष्मण लोंढे, लेखापाल भाजीपाले, शशांक डांगे, अभिषेक शिंदे, विनायक चौधरी, वंजारी, दुपारे, ठाकरे तसेच नगरपरिषदेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.
-------
बल्लारपूर पालिकेत निषेध
बल्लारपूर : ठाणे येथील घटनेचा बल्लारपूर नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवस ‘काम बंद’ ठेवून निषेध केला आहे. उपविभागीय अधिकारी दीप्ती सूर्यवंशी पाटील यांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक, उपमुख्य अधिकारी जयवंत काटकर, अभियंता संजय बोढे, कार्यालय अधीक्षक संगीता उमरे व अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
------
भद्रावतीत प्रशासकीय कामकाज बंद
भद्रावती : ठाणे येथील घटनेचा निषेध म्हणून भद्रावती नगरपरिषदेचे संपूर्ण प्रशासकीय कामकाज कडकडीत बंद ठेवण्यात आले. याप्रसंगी नगरपरिषद मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांच्या नेतृत्वात सर्वच प्रशासकीय कर्मचारी यांनी नगरपरिषदेच्या समोर येऊन घटनेचा निषेध नोंदविला. याप्रसंगी उपमुख्य अधिकारी जगदीश गायकवाड, राजू काळे, रवींद्र गड्डमवार, लहू लेंगरे, आशिष देशमुख, अंतर्गत लेखापाल बोरा, संतोष नामोजवार, ऋतुराज सूर्य, भूपेश कांबळे, रफिक शेख व अन्य प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
-----
पोंभुर्णा येथे ठाणे घटनेचा निषेध
पोंभुर्णा : ठाणे येथील घटनेचा पोंभूर्णा नगरपंचायतीत अधिकारी तसेच कर्मचारीवर्गाकडून प्रशासकीय कामकाज बंद ठेवून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. गुन्हेगारांविरुद्ध योग्य ती कडक कार्यवाही व्हावी, याबाबतचे निवेदन तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.