मूल : देशात वाढत चाललेल्या बेरोजगारावर मात करण्यासाठी मोदी सरकारने गंभीरपणाने विचार सुरू केला असून उद्योगातून रोजगार देण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचा लाभ देशातील २० कोटी तरुणांना होणार असून त्यांच्या हाताला काम मिळून ते आत्मनिर्भर करण्याचा सरकारचे प्रयत्न असल्याचे मत कें़द्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले. मूल तालुका पत्रकार संघाशी ‘संवाद’ कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरुनुले, नगराध्यक्ष रिना थेरकर, उपाध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नगरसेवक मोती टहलियानी, प्रभाकर भोयर, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, प्रशांत लाडवे, अनिल संतोषवार, अनिल साखरकर, सुनील आयलनवार, नंदू रणदिवे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना ना. अहीर म्हणाले, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून एका वर्षात सात हजार कोटी रुपयाची मदत करण्यात आली आहे. खतांचे पुढील चार वर्षे भाव वाढणार नाही, असा धाडसी निर्णय सुद्धा केंद्र शासनाने घेतला आहे. देशाला ३०० लाख टन युरियाची गरज आहे. आपल्या देशात २३० टन युरिया तयार होत असून उर्वरित चीन, रशिया या देशातून आयात केला जातो. यावेळी सरकारने निमकोटेट युरियाची निर्मिती तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्यामुळे युरियाची इतर पदार्थात भेसळ केली जाणार नाही.बेरोजगारांनी मदत करून कौशल्य विकासातून उद्योग निर्माण करण्याचा व बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न सरकारचा आहे. देशातील तरुणांना काम, निर्भत्सना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाणार आहे. शासनाने शेतकऱ्याच्या हितार्थ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निर्माण केली असून यातून शेतकऱ्यांच्या शेतीला फायदा होईल. याचबरोबर राज्य शासनाने देखील जलयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ केल्याने केंद्र व राज्य शासनाची सिंचनाची योजना शेतकऱ्यांना वरदान ठरू पाहत आहे, असे त्यांनी सांगितले.काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला. मात्र गरिबी हटली नाही यासाठी काँग्रेसकडे गरीबांचे धोरण आखले नव्हते. गरिबीचे मुळ कारण बेरोजगारी असल्याने बेरोजगारांना काम दिल्यास आपोआपच गरीबीचे निर्मूलन होण्यास मदत होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी पत्रकार संघातर्फे संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी ना. हंसराज अहीर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. (तालुका प्रतिनिधी)भूमी अधिग्रहण कायद्यात बदलभूमी अधिग्रहण कायदा हा १८९४ चा इंग्रजकालीन होता. त्यात बदल करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. भाजपा सरकारने चार पट मोबदला व एकास नोकरी देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सव्वा लाख भूमी अधिग्रहीत करुन लाखो कुटुंबाची तत्कालीन सरकारने लूट केल्याचे ना. अहीर यांनी यावेळी सांगितले.
देशातील २० कोटी तरुणांना मिळणार काम
By admin | Published: September 23, 2015 4:52 AM