लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : माजी आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू नये म्हणून भाजपने खोटा प्रचार केला होता. आता जनतेचा पाठिंबा मिळत असल्याने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली. त्यामुळे सत्य दडपण्यासाठी भाजपकडून पुन्हा खटाटोप सुरू आहे, असा आरोप आमदार विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला.आ. वडेट्टीवार म्हणाले, काँँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना पीरिपा, रिपाइं, शेकाप, गोंडवाना गणतंत्र पार्टी, कम्युनिष्ट पार्टी व मनसेने समर्थन दिले आहे. लोकसभा मतदार संघातील जनतेकडून मोठा पाठिंबा मिळत असल्याने भाजप उमेदवाराचा पराभव दिसत आहे. त्यामुळे जनतेची दिशाभूल करणे सुरू झाले.श्रमिक एल्गार व स्वामिनी या संघटना दारूचा विषय पुढे करून काँग्रेसचे उमेदवार धानोरकर यांना विरोध करीत आहेत. या विरोधाला भाजपची फूस आहे. स्वामिनी ही संघटना तर भाजपची बी टिम असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा मतदार संघासाठी केंद्राने १३ हजार ८०० कोटींचे पॅकेज दिल्याचे भाजपचे उमेदवार हंसराज अहीर सांगत आहेत. त्यांनी हा निधी कुठे खर्च केला, हे जनतेला सांगावे, अशी मागणी काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी केली. यावेळी आमदार ख्वाजा बेग, मनोहर पाऊणकर, नंदू नागरकर, प्रकाश देवतळे, राकेश रत्नावार आदी उपस्थित होते.
राहुल गांधी आज चंद्रपुरातअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची शुक्रवारी दुपारी २ वाजता चांदा क्लब ग्राऊंंडवर जाहीर सभा होणार आहे. या सभेत प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आ. विजय वडेट्टीवार यांनी दिली.हेलिपॅडप्रकरणी तक्रार करणारराहुल गांधी यांच्या सभेसाठी हेलीपॅडला परवानगी देण्यास प्रशासनाने जाणीवपुर्वक दिरंगाई केली. हा सर्व प्रकार सरकारच्या दबावामुळेच घडला आहे. सभा होऊच नये, याकरिता मंत्र्यांनी दबाव टाकला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता संजय जाधव यांच्याविरूद्ध जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करू, अशी माहिती माहिती आ. वडेट्टीवार यांनी दिली.