ऑनलाईन लोकमतदुर्गापूर : चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सारंग कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये कार्यरत एका कामगाराचा स्टोअर शेडवर चढून शिट बदलवित असताना खाली पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. मृताच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी मृतदेह चक्क वीज केंद्राच्या मेजर गेटसमोर रस्त्यावर ठेवण्यात आला. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वीज केंद्र व्यवस्थापनाने साडेपाच लाखांचा धनादेश व ५० हजार रुपये रोख दिल्याने दिल्याने तणाव निवळला.गरीबदास सावलदास मानकर (४५) रा. दुर्गापूर असे मृताचे नाव आहे. तो वीज केंद्रातील कंत्राटी कंपनी सारंग कन्स्ट्रक्शनमध्ये काम करीत होता. गुरुवारी तो स्टोअर शेडवर चढून शीट बद्दलविण्याचे काम करीत होता. दरम्यान काम करीत असताना त्याचा तोल गेल्याने स्टोअरवरून तो खाली पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
कामगाराचा मृतदेह ठेवला रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:37 AM
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सारंग कन्स्ट्रक्शन या कंपनीमध्ये कार्यरत एका कामगाराचा स्टोअर शेडवर चढून शिट बदलवित असताना खाली पडून मृत्यू झाला.
ठळक मुद्देव्यवस्थापनाकडून भरपाई : काम करताना खाली पडल्याने मृत्यू