शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"राज ठाकरे यांना फसवलं, इव्हीएममुळेच महायुती जिंकली’’, मनसेचा गंभीर आरोप
4
Jacqueline Fernandez : "तिला काहीच..."; सुकेशकडून महागड्या भेटवस्तू घेणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसच्या वकिलांचा युक्तिवाद
5
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
6
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
7
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
8
ऐश्वर्या रायबाबत भावजयचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
9
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
10
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
11
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
12
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
13
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
14
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
15
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
16
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
17
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
19
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
20
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?

धारीवाल प्रशासनाच्या विरोधात कामगारांचा संप

By admin | Published: July 28, 2016 1:31 AM

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीतील कामगारांनी बुधवारी पहाटेपासून प्रशासनाच्या विरोधात संप पुकारला आहे.

घोडपेठ : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी एमआयडीसी येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमीटेड या कंपनीतील कामगारांनी बुधवारी पहाटेपासून प्रशासनाच्या विरोधात संप पुकारला आहे. प्रशासनाने चर्चा करून कामगारांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी कामगार नेते दिनेश चोखारे यांनी केली आहे. ताडाळी येथील धारिवाल पॉवर कामगार संघटना एमआयडीसीतर्फे ९ जुलै रोजी धारिवाल प्रशासनाला मागण्यांचे पत्र सोपविण्यात आले होते. या पत्राची प्रतिलीपी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, सहाय्यक कामगार आयुक्त, उपसंचालक (आरोग्य व सुरक्षा) तसेच पडोलीचे ठाणेदार यांनासुध्दा देण्यात आली होती. या पत्रातील मागण्या मान्य न झाल्यास २७ जुलै रोजी बेमुदत कामबंद आंदोलन केले जाईल येईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानुसार मागण्यांवर तोडगा न निघाल्याने धारिवाल पॉवर कामगार संघटनेतर्फे कामगारांचा संप पुकारण्यात आला आहे. बुधवारी सकाळी ६ वाजेपासून कामगारांनी बेमुदत संपाला सुरूवात केली आहे. सकाळी ११ वाजता संघटनेतर्फे दिनेश चोखारे यांच्या अध्यक्षतेखाली ताडाळी येथील साखरवाही फाटा परिसरात संपात सहभागी असलेल्या कामगारांची सभा घेण्यात आली. यावेळी संघटनेचे प्रवक्ते बाळकृष्ण जुवार, रमेश बुच्चे, सचिन कत्याल, पवन अगदारी, संतोष बांदूरकर, रूपेश झाडे, सचिन विरूटकर प्रामुख्याने उपस्थित होते. (वार्ताहर) सध्या ताडाळी येथील एमआयडीसी ही जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाची एमआयडीसी समजली जाते. या एमआयडीसीमध्ये धारिवाल ईन्फ्रास्ट्रक्चर लिमी. हा ६०० मेगावॅट विद्युत निर्मितीचा प्रकल्प सुरू आहे. सोबतच इतरही अनेक प्रकल्प या एमआयडीसीमध्ये आहेत. जिल्ह्यातील नविन उद्योगांवर असलेली बंदी नुकतीच उठविण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी नविन उद्योगांना येण्यासाठी प्रवेशद्वार खुले झाले आहे. मात्र, जुन्या उद्योगांची अवस्था अतिशय दयनीय आहे. याठिकाणी असलेले बरेचशे प्रकल्प हे बंद अवस्थेत आहेत. परिसरातील बेरोजगारीचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. अशातच कामगारांनी पुकारलेला हा संप कोणते वळण घेईल, याकडे परिसरातील उद्योग जगताचे लक्ष लागले आहे.