लोकमत न्यूज नेटवर्कसावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा ग्रामपंचायतीने गावातील सर्व नाल्यांचा उपसा करण्यासाठी मजुरांना दिवसाकाठी २०० रुपये मजुरीने काम देण्याचे ठरविले. दरम्यान, प्रत्यक्ष काम सुरु केल्यानंतर १६० रुपये परदिवस देण्याचे कबूल केल्याने मजूर भडकले आणि काम बंद करून रिकाम्या हाताने घरी परतल्याचा प्रकार वाढोणा ग्रामपंचायतीत घडला.वाढोणा ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच उज्ज्वला ठाकूर यांनी पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी गावातील सर्व नाल्यांचा उपसा करण्याकरिता मजुरांना २०० रुपये दिवसाप्रमाणे मजुरी देण्याचे ठरविले. काम सुरू झाल्यानंतर १६० रुपये मिळेल असे सांगितल्यामुळे ग्रामपंचायतीसमोर एकत्र येत मजुरांनी काम बंद करून ग्रामपंचायत प्रशासनाने निवेदन दिले. जोपर्यंत २०० रुपये मजुरी मिळणार नाही, तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याचा इशारा दिला.दोनशे रुपये मजुरी ठरविण्यात आली नव्हती.ग्रामपंचायत फंडामध्ये रक्कम पूरेशी नसल्यामुळे १६० नंतर १७५ रुपये देण्याचे ठरले. मात्र मजुर कामावर आले नाही.- उज्ज्वला ठाकूर,सरपंच, वाढोणा
ग्रामपंचायतीने ठरविल्यानुसार मजुरी न दिल्याने मजूर भडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2020 5:00 AM
वाढोणा ग्रामपंचायतच्या प्रभारी सरपंच उज्ज्वला ठाकूर यांनी पावसाळ्यापूर्वीच्या कामांना सुरूवात केली आहे. यासाठी गावातील सर्व नाल्यांचा उपसा करण्याकरिता मजुरांना २०० रुपये दिवसाप्रमाणे मजुरी देण्याचे ठरविले.
ठळक मुद्देविश्वासघात केल्याचा आरोप : काम न करताच मजुरांची घरवापसी