शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

चंद्रपूर जिल्ह्यातील जॉबकार्ड असलेले मजूर ‘जॉबलेस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2020 2:45 PM

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे अडीचहजार जॉबकार्डधारक शेतमजुरांच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याचे मार्गही बंद झाले.

ठळक मुद्देलॉकडाऊन काळातील स्थिती भात शेतीची कामे संपली, जॉबकार्डधारक रोजगाराविना हताश

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : धान उत्पादनाचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागातील मजुरांना अन्य रोजगार शोधला तरच आर्थिक कोंडीवर काही प्रमाणात मात करता येते. मात्र, लॉकडाऊनमुळे यंदाच्या हंगामी रोजगारावर टाच आली. जिल्ह्यातील सुमारे अडीचहजार जॉबकार्डधारक शेतमजुरांच्या हाताला काम नाही. रोजगारासाठी गावाबाहेर जाण्याचे मार्गही बंद झाले. त्यामुळे मनरेगा कामावर पोटाची खळगी भरणाऱ्या मजुरांसमोर ‘इकडे आड तिकडे विहिर’ अशी स्थिती निर्माण झाली आहे.केवळ शेतीवर निर्भर असणाºया ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत (मनरेगा) राज्य अभिसरण आराखडा अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला.यानुसार मनरेगा योजनेसोबत विविध योजनांचा समावेश करून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी मनरेगाची कामे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नोंदणीकृत मजुरांच्या संख्येनुसार मनरेगा कामाचे उद्दिष्ट देण्यात आले.सर्वच तालुक्यांनी विविध विभागांच्या योजनांना सामील करून मनरेगा योजनेशी करण्याचे धोरण तयार केले. आर्थिक वर्षात १५ आॅगस्ट ते ३० नोव्हेंबर या कालावधीत कृती आराखडा तयार झाला. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे योजनेच्या अंमलबजावणीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे, हे येथे उल्लेखनीय.

अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचा फटकाजिल्ह्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींनी कोरोनापूर्वी कुटुंबांची नोंदणी केली. रोजगाराच्या गरजेचा पूर्व वार्षिक अंदाज, आराखडा व कामाचे प्राधान्य याकडेही लक्ष दिले होते. ग्रामसभांनी लगेच ठराव पारित केले. मात्र, टाळेबंदीने ग्रामपंचायतींचे नियोजन बिघडविले. सर्वसामान्य नागरिकांना रोजगार मिळावा, अशी आत्मियता जोपसणाºया काही गटविकास अधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने कामे सुरू होऊ शकली. परंतु, बहुतांश तालुक्यांना केवळ अधिकाऱ्यांच्या उदासिनतेचाच फटका बसत आहे.सध्या तरी खरीप हंगामाच्या कामाला वेग आला नाही. टाळेबंदीमुळे मजूर नाईलाजास्तव घरीच आहेत. सर्वच ग्रामसभा मनरेगा कामे सुरू करण्याच्या बाजुने आहेत. मजुरांची आर्थिक कोंडी दूर करण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळून प्रशासनाने कामे सुरू केल्यास मोठा आधार मिळू शकतो.-साईनाथ कोडापे, उपसरपंच लाठी, ता. गोंडपिपरी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस