लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अटल विश्वकर्मा सन्मान योजना मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.स्थानिक विठ्ठल मंदिर प्रभाग क्र. १५ येथील हनुमान मंदिर येथे १८ ते ६० वयोगटातील कामगारांसाठी कामगार मेळावा नुकताच पार पडला. यावेळी त्या उद्घाटक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रभाग अध्यक्ष रमेश भुते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका संगिता खांडेकर, नगरसेविका सिमा रामेडवार विनोद शेरकी, धनंजय हुड, सुर्यकांत कुचनवार, राजेंद्र खांडेकर, अटल विश्वकर्मा सन्मान योजनेचे अधिकारी अतुल कांबळे, लक्ष्मण आत्राम आदी उपस्थित होते.यावेळी महापौर घोटेकर पुढे म्हणाल्या, कामगार क्षेत्रातील सर्व घटकांना शासनाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ घेता यावा याकरिता शासनातर्फे व नगर प्रशासनातर्फे प्रत्येक वॉर्डावॉर्डामध्ये नोंदणी शिबिर घेऊन नागरिकांना जागृत करावे. तसेच योजनेचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर उपस्थित पाहुण्यांनी मार्गदर्शन करताना कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. याप्रसंगी महापौर अंजली घोटेकर यांच्या हस्ते अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत कामगारांना नोंदणी अर्ज व कॉर्डचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे संचालन महेश कोलावार यांनी प्रास्ताविक राजेंद्र खांडेकर तर आभार अक्षय खांडेकर यांनी मानले. यावेळी कल्याणी दडमल, जया दातारकर, किरण गराटे, मनिषा डुकरे, कोमल गायकवाड, प्रदिप पडगेलवार, विजय क्षिरसागर, बंडू रागीट, मनिषा पंदीलवार, प्रणीता आकनपल्लीवार, गणेश सातपुते, अशोक नवघरे, रामदास कोहपेर, बंडू जवादे, दिलीप नागापूरे, राजू काटकर यांच्यासह शहरातील कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
कामगारांनी योजनांचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 11:24 PM
अटल विश्वकर्मा सन्मान योजना मंडळातर्फे बांधकाम कामगारांसाठी २८ प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. या मंडळाच्या कल्याणकारी योजनेचा लाभ कामगारांनी घ्यावा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
ठळक मुद्देअंजली घोटेकर : चंद्रपुरात कामगार मेळावा