आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील ८ ते १० वर्षांपासून काम करणाऱ्या १३७ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरून काढण्यात आले. कामगारांना कामावर परत घ्या या मागणीसाठी प्रहारचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कामगारांनी बुधवारी रूग्णालयात ठिय्या आंदोलन केले.अपंग प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंदणी, जननी शिशू सुरक्षा योजना, स्वयंपाकी, सुरक्षा रक्षक अशा विविध व संवेदनशील ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक कामावरून काढल्याने रूग्णालयातील अत्यावश्यक सेवा प्रभावित झाली आहे. शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या चुकीमुळे १३७ कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली निघल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा प्रहारचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला आहे.
जिल्हा रूग्णालयात कामगारांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:30 AM