सावरगाव : नागभीड तालुका वंचित बहुजन आघाडी पंचायत समिती क्षेत्र गिरगावची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीला नागभीड तालुका निरीक्षक सुखदेव प्रधान, जिल्हा कार्यकारिणी सदस्य अश्विन मेश्राम, तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे आदींची उपस्थिती होती. आगामी काळात येणाऱ्या जि. प. व पं. स. निवडणूक संदर्भात विचार मंथन व नियोजन करण्यात आले.
यावेळी सुहास सोनवाने, वासुदेव सोनवाने, डॉ. गौतम खोब्रागडे, रविंद्र खोब्रागडे, कृष्णदास मेश्राम, बंडूभाऊ खोब्रागडे, खुशाल खोब्रागडे, गोविंदा रामटेके, चंद्रशेखर बारसागडे, गणपत खोब्रागडे, हरीचंद्र खोब्रागडे, मालाबाई खोब्रागडे, सिंधू खोब्रागडे, वीणा खोब्रागडे, हर्षा खोब्रागडे, सुनंदा खोब्रागडे, सुनंदा खोब्रागडे आदींनी पक्षाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी तालुका अध्यक्ष खेमदेव गेडाम, तालुका महासचिव शैलेंद्र बारसागडे, तालुका सचिव संतोष जीवतोडे, दलित अलोणे, चंद्रभान रामटेके, धर्मराव गराडकर, तालुका महिला अध्यक्षा कल्पना खरात, तालुका महिला महासचिव सुकेशनी रामटेके आदी उपस्थित होते. संचालन सुभाष खोब्रागडे तर आभार विकास गोंडाने यांनी मानले.