लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी तालुक्यात निर्माण केलेल्या लघुसिंचन विभागाच्या तलावांची स्थिती अतिशय वाईट आहे. बहुतेक प्रकल्पांची कामे रखडल्याने कृषी सिंचनाचे स्वप्न भंगणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.गुडसेला, कोदेपूर व जिवती तीन गावात लघुसिंचन विभागाच्या वतीने २०१३ मध्ये सिंचन तलावाचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी शेतकऱ्यांची जमिनीचे अधिग्रहण करण्यात आले. मात्र, त्या शेतकऱ्यांना काहीच फायदा मिळाला नाही. प्रकल्प अर्धवट असल्याने शेतीला पाणी मिळत नाही. २०१५ मध्ये महसुल विभागाने विनापरवाना शेत जमिनीचे खोदकाम केल्याचा ठपका ठेवत कंत्राटदावर २ कोटी १३ लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावाची पाहणी केली. सदर तलावाचे खोदकाम वनविभागाच्या हद्दीत झाल्याची नोटीस बजावली. परिणामी, कोदेपूर, गुडसेला व जिवती येथे सुरू असलेल्या सिंचन तलावाचे काम बंद पडले आहे. या घटनेला तब्बल तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला. जमीन अधिग्रहण केलेल्या शेतकºयांचे हाल सुरू आहेत. संबंधित अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदन देऊनही आश्वासनांशिवाय काहीच मिळाले नाही, असा आरोप केला जात आहे.रखडलेल्या सिंचन तलावाचे काम तातडीने सुरू करावे. अधिग्रहण केलेल्या शेतकऱ्यांना मोबदला द्यावे अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.- ममता जाधव, शेतकरी, जिवती
पहाडावरील सिंचन तलावांची कामे रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 10:49 PM
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी तालुक्यात निर्माण केलेल्या लघुसिंचन विभागाच्या तलावांची स्थिती अतिशय वाईट आहे. बहुतेक प्रकल्पांची कामे रखडल्याने कृषी सिंचनाचे स्वप्न भंगणार काय, असा प्रश्न विचारला जात आहे.
ठळक मुद्देउत्पन्न घटणार : शेतकऱ्यांमध्ये नाराजी