वरोरा : आनंद निकेतन महाविद्यालयात नॅक या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
प्रा. अंजली कदम या कार्यशाळेला वक्त्या म्हणून लाभल्या होत्या. एकंदरच नॅक प्रक्रिया, ती राबवताना येणारे प्रश्न, त्यातील समस्या याबाबतचे अतिशय विस्तृत विवेचन त्यांनी केले. नॅकच्या विविध बाबींचा आढावा त्यांनी याप्रसंगी घेतला आणि या विषयावरील चर्चेतून महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या शंकाचे निरसनही त्यांनी या कार्यशाळेतून केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे हे या कार्यशाळेचे अध्यक्ष होते. डॉ. जी. के सिंग यांनी आपल्या प्रास्ताविकेतून या संपूर्ण कार्यशाळेची माहिती विषद केली. याप्रसंगी डॉ. निलेश उगेमुगे यांनी प्रा. अंजली कदम यांचा परिचय करून दिला. संचालन प्रा. प्रियंका भुक्या यांनी व आभार प्रदर्शन प्रा. विद्या दडमल यांनी केले.