भद्रावती : येथील विवेकानंद महाविद्यालयातील पर्यावरण विभाग, योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय पालक-मित्रमंडळ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने शुक्रवारी एकदिवसीय संयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
जीवाणूयुक्त मातीतून विषमुक्त शेतीकडे या अभियानांतर्गत आयोजित या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे तर कृषितज्ज्ञ कोमलसिंग चौहाण, टी. के. भोलाने हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अनेक वर्षांपासून रासायनिक खते, औषधे आणि तणनाशकांच्या अतिवापरामुळे शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सेंद्रिय, जैविक औषधांचा वापर करून शेतजमिनीची उत्पादन क्षमता वाढवावी, याविषयी कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी योद्धा संन्यासी मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम मत्ते, सचिव माधव कवरासे, अण्णा कुटेमाटे, बबन शेंबळकर यांच्यासह भद्रावती परिसरातील शेतकरी, पालक, प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
180921\img_20210918_133028.jpg
विवेकानंद महाविद्यालयात विषमुक्त शेती या विषयावर कार्यशाळा संपन्न